'नाईलाज आहे!', घाटी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी पदांच्या रांगेत इंजिनीअर, बी. फार्मसीसह उच्चशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:26 IST2026-01-22T19:25:26+5:302026-01-22T19:26:06+5:30

३५७ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू, घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी समिती तपासत आहे.

'There is no cure', Engineer, B. Pharmacy and other highly educated people in line for fourth grade posts at Valley Hospital | 'नाईलाज आहे!', घाटी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी पदांच्या रांगेत इंजिनीअर, बी. फार्मसीसह उच्चशिक्षित

'नाईलाज आहे!', घाटी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी पदांच्या रांगेत इंजिनीअर, बी. फार्मसीसह उच्चशिक्षित

- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर :
घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ३५७पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेचा निकाल १ जानेवारीला जाहीर झाला. गुणवत्ताधारकांच्या कागदपत्रे पडताळणीला बुधवारी सुरुवात झाली. इंजिनीअर, बी. फार्मसी, एम. एसस्सी. सह उच्चशिक्षित उमेदवार हे चतुर्थ श्रेणी पदांच्या रांगेत आहेत. एका अधिकाऱ्याने उच्चशिक्षित तरुणीला 'घाटीमध्ये सफाईचे काम करणार?', असा सवाल केला. त्यावर 'सर, नाइलाज आहे, नोकरी म्हणून करावे लागेल', असे ती म्हणाली. 

घाटी रुग्णालयाची सुरुवात होताना १९५६ मध्ये सरळ सेवेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरली होती. तब्बल ६९ वर्षांनंतर त्याला यावर्षी मुहूर्त मिळाला. गतवर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल नव्या वर्षाच्या प्रारंभी लागला. उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीला बुधवारी सुरुवात झाली. आगामी २८ जानेवारीपर्यंत रोज ५० ते ६० जणांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
पद - रिक्त पदे ः चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे -३०, आया - २, माळी ७, प्रयोगशाळा परिचर - १८
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
पद-रिक्त पदे : चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे- २८५, दाया - १, बॉयलर चालक १, पाणक्या - १, ड्रेसर -२, माळी - ४, नाभिक - ६

Web Title : बेबस: उच्च शिक्षितों ने चतुर्थ श्रेणी नौकरी के लिए आवेदन किया।

Web Summary : सरकारी अस्पताल में चतुर्थ श्रेणी के पदों के लिए इंजीनियरों सहित उच्च शिक्षित लोग आवेदन कर रहे हैं। अवसरों की कमी के कारण, वे रोजगार हासिल करने के लिए सफाई जैसे काम को भी स्वीकार करने को तैयार हैं, जो व्यापक नौकरी की कमी को दर्शाता है।

Web Title : Desperate Times: Educated Apply for Class IV Jobs at Hospital.

Web Summary : Highly educated individuals, including engineers, are applying for Class IV positions at a government hospital due to lack of opportunities. Faced with limited options, they are willing to accept even sanitation work to secure employment, highlighting widespread job scarcity.