चोरी प्रकरणातील आरोपीस कोठडी

By Admin | Updated: June 19, 2016 23:19 IST2016-06-19T23:15:12+5:302016-06-19T23:19:58+5:30

गंगाखेड : सिकंदराबाद- शिर्डी रेल्वेतील जबरी चोरीतील अटकेत असलेल्या आरोपीस रेल्वेच्या औरंगाबाद येथील न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Theft accused in the theft case | चोरी प्रकरणातील आरोपीस कोठडी

चोरी प्रकरणातील आरोपीस कोठडी

गंगाखेड : सिकंदराबाद- शिर्डी रेल्वेतील जबरी चोरीतील अटकेत असलेल्या आरोपीस रेल्वेच्या औरंगाबाद येथील न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गंगाखेड रेल्वेस्थानकावर १८ जूनच्या पहाटे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या सिकंदराबाद- शिर्डी एक्स्प्रेस रेल्वेमध्ये आरक्षित डब्यातील प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या चोरट्यास गंगाखेड रेल्वे पोलिस देवीदास मिरासे यांनी पाठलाग करुन पकडले होते. याप्रकरणी वाय.राघव रेड्डी (रा.कृष्णानगर कलनूर, आंध्रप्रदेश) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी संजय पोशेट्टी शिंदे (रा.बागल पार्डी ता.वसमत) यास १९ जून रोजी औरंगाबाद रेल्वेच्या न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी फौजदार आनंद बनसोडे यांनी दिली. तीन फरार आरोपीच्या शोधात फौजदार आनंद बनसोडे, अन्वर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास मिरासे, राकेश पांडे, उमेश देवरे, प्रभाकर चिंचाणे, संजय काळे, ज्ञानेश्वर निमसाखरे यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

Web Title: Theft accused in the theft case