जुन्या जलवाहिनी मागील विघ्न सुटेना; पैठणरोडवर जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत
By मुजीब देवणीकर | Updated: November 18, 2022 19:14 IST2022-11-18T19:13:45+5:302022-11-18T19:14:05+5:30
काही भागात उशिराने तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची मनपाची माहिती

जुन्या जलवाहिनी मागील विघ्न सुटेना; पैठणरोडवर जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत
औरंगाबाद: जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या मागील विघ्न काही करता संपायला तयार नाही. सर्वात जुनी असलेली ५६ दललि क्षमतेची व ७०० मिमी व्यासाची पाईपलाईन आज शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पैठणरोडवरील कवडगाव जवळ फुटली.
विशेष म्हणजे नवीन पाणी पुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे काही भागात उशिराने तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.