शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

'ज्या दिवशी आंबेडकरवादाची अनुभूती होईल, आयुष्य बदलेल'; सुमित चौहान यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:58 IST

आंबेडकरवादाची जाणीव झाली तर आयुष्य उजळेल! ‘नागसेन फेस्टिव्हल’चा आज समारोप

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरवादी आंदोलन चालविण्याची आज समाजाला गरज आहे. ज्या दिवशी युवकांना आंबेडकरवादाची अनुभूती होईल, त्या दिवसापासून आपले संपूर्ण जीवन बदलेल, असे प्रतिपादन दिल्ली येथील युवा पत्रकार सुमित चौहान यांनी केले.

‘नागसेन फेस्टिव्हल’चा विचारांचा जागर रविवारपासून सुरू झाला. सोमवारी दुसऱ्या दिवशी फेस्टिव्हलमध्ये डिजिटल मीडिया अर्थात यूट्यूब, वेब पोर्टल, पॉडकास्ट यांच्या माध्यमातून देशातील शैक्षणिक व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या युवा पत्रकारांचा ‘नव माध्यमातील आंबेडकरी पत्रकारितेचे वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात सुमित चौहान (दिल्ली), साहिल वाल्मीकी (नोएडा), हितेश कुमार (दिल्ली), राज असरोडकर (उल्हासनगर) आणि मनीष सागर (मनाली) सहभागी झाले होते.

ऐनवेळी सायंकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे या फेस्टिव्हलचे कार्यक्रम लगतच्या रंगमंदिरात घेण्यात आले. परिसंवादात बोलताना सुमित चौहान म्हणाले, बहुजन मीडियात काम करणाऱ्या युवकांचा उत्साह वाढवा. बहुजन मीडियाला प्रोत्साहन द्या. नेहमी एक प्रश्न विचारला जातो की, आंबेडकरी पत्रकारितेसाठी आपणास प्रेरणा कोठून मिळाली. तेव्हा मी सांगतो, महात्मा फुले, आंबेडकर, कांशिराम, पेरियार यांच्यापासून मला पत्रकारितेची प्रेरणा मिळते. हा वारसा मला तथागत गौतम बुद्धांपासून मिळाला. माझे पूर्वज व्यवस्थेला प्रश्नच विचारत होते. संत रविदास, संत कबीर यांची वाणी, त्यांचे दोहे म्हणजे व्यवस्थेला विचारलेले प्रश्न होते. आंबेडकरवादी पत्रकारितेची परंपरा अनेक शतकापासून सुरू आहे.यावेळी उर्वरित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

या परिसंवादापूर्वी ‘एल्गार समतेचा’ हे कवी संमेलन पार पडले. यात ‘कौन जात हो भाई’ या प्रसिद्ध कवितेचे रचनाकार युवा कवी बच्चालाल उन्मेष (बनारस), डॉ. अनिकेत खांडकर (मुंबई), गिरीश खोब्रागडे (यवतमाळ) आणि गणेश खरात यांनी सादर केलेल्या विद्रोही कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. सचिन निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सिद्धार्थ मोकळे यांनी प्रास्ताविक केले.

फेस्टिव्हलमध्ये आज अभिनेेते मिलिंद शिंदेफेस्टिव्हलच्या समारोप समारंभात रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त बेजवाडा विल्सन हे ‘तंत्रज्ञानाचा बुरखा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा चेहरा : भारताचं जात वास्तव’ या विषयावर भाष्य करतील. सिनेअभिनेते मिलिंद शिंदे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. त्यानंतर ‘जल्लोष भीमजयंतीचा’ या विशेष सत्रात प्रांजल सुरडकर, रिदम रिव्होल्यूशन संघाचा फ्लॅश मॉब, विपीन तातड आणि टीम यांचे रॅप सादरीकरण होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Experiencing Ambedkarism Transforms Life: Sumit Chauhan's Insightful Perspective

Web Summary : Youth must embrace Ambedkarism for life transformation, says journalist Sumit Chauhan at Nagasen Festival. A panel discussed Ambedkarite journalism's present and future, emphasizing inspiration from figures like Phule, Ambedkar, and Periyar. The festival also featured poetry and will conclude with discussions and performances.
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNagsen vanनागसेन वन