बेपत्ता दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 15:18 IST2023-01-16T15:16:23+5:302023-01-16T15:18:13+5:30

१४ तारखेला दोन्ही बहिणी गायब झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली

The body of one of the two missing sisters has been found! | बेपत्ता दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळला!

बेपत्ता दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळला!

कन्नड (औरंगाबाद) : तालुक्यातील चिखलठाण येथून बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणीचा मृतदेह विहीरीतील पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्वाती आणि शीतल दत्तू चव्हाण असे मृत मुलींचे नाव आहे.

दत्तू बाबुराव चव्हाण हे शेतात राहतात. त्यांच्या दोन मुली स्वाती दत्तू चव्हाण (१८) व शितल दत्तू चव्हाण या बेपत्ता असल्याची खबर १४ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी दत्तू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत स्वातीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यानंतर काही वेळातच शितलचा मृतदेह त्याच विहिरीत आढळून आला. 

घटनेची माहिती मिळताच सपोनि टी आर भालेराव, पोउपनि राम बारहाते, सहाय्यक फौजदार सतिष खोसरे,  कैलास करवंदे, संजय आटोळे, शिवदास बोराडे हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Web Title: The body of one of the two missing sisters has been found!