शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय परिसरातच थाटले औषधी दुकान

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई सामान्य रुग्णांसाठी वरदान ठरलेले यैथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई सामान्य रुग्णांसाठी वरदान ठरलेले यैथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले असून रुग्णालयात निर्माण झालेल्या गैरसोयीमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. रुग्णालयात सर्व अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची पूर्ण क्षमता असतांनाही दररोज शेकडो रुग्णांना पॅथॉलॉजी तपासण्या, सोनोग्राफी तपासण्या व विविध औषधांची खरेदी बाहेरूनच करावी लागते. परिणामी दररोज हजारो रुपयांचा भुर्दंड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना निमूटपणे सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर शासनाच्याच परवानगीने मेडीकल कॉलेज परिसरात, मेडीकल स्टोअर्स सुरू करण्यात आले आहे. या मेडीकल स्टोअर्समधून २४ तास औषधांची विक्री सुरू असते. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे दिवसेंदिवस रुग्णालयाची दुरवस्था वाढत चालली आहे. परिणामी रुग्णांची हेळसांड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. रुग्णालयात दररोज किमान १५०० ते १६०० बाह्य रुग्ण तपासणीसाठी येतात. तर ३०० ते ४०० आंतररुग्ण दाखल होतात. सामान्य रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या या रुग्णालयाने आता आपली भूमिकाच बदलल्याने रुग्णांची मोठी हेळसांड सुरू झाली आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्त, लघवी व विविध पॅथॉलॉजी तपासण्यासाठी दररोज हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करून बाहेरून तपासण्या करून आणाव्या लागतात. या सर्व सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत. मात्र, वेळेअभावी व डॉक्टरांच्या सांगण्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे काहीच चालत नाही. तसेच स्त्रीरोग व प्रसूतीकक्ष विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सोनोग्राफी मशीन बंद आहे. या कक्षात दररोज किमान ३० ते ३२ महिलांची प्रसुती दैनंदिन असते. यातील किमान अर्ध्या महिलांना तरी सोनोग्राफी करणे क्रमप्राप्त ठरते. रुग्णालयातच सोनोग्राफी मशीन नसल्याने या रुग्णाला चार किलोमीटरचा हेलपाटा व एका तपासणीला पाचशे ते सातशे रुपये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु शासनानेच या समस्येवर यावर तोडगा काढला आहे. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शासनानेच मेडीकल स्टोअर्स सुरू करण्याची परवानगी एका संस्थेला देऊन या संस्थेचे मेडीकल स्टोअर्स २४ तास उघडे असते. औषधे खरेदी करण्यासाठीही येथे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. आला पेशंट की दे यादी. अशी स्थिती असल्याने प्रत्येक ठिकाणी पैसा मोजूनच उपचार घेण्याची वेळ सामान्य रुग्णांवर आली आहे. प्रशासनाची उदासिनता रुग्णासाठी घातक प्रशासनाच्या उदासीन व बोटचेपे भूमिकेमुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा मोठा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. सर्व सेवा व सुविधा उपलब्ध असून काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळे रुग्णांना बाहेरून अनेक तपासण्या कराव्या लागतात. या संदर्भात प्रशासनाने वेळीच ठोस उपाय योजना न आखल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. सुभाष शिंदे यांनी दिला आहे. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्याकडे विचारणा केली असता अशा तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाहेर जावे लागू नये, याची दक्षता प्रशासन घेईल व तपासण्या करणासाठी बाहेर पाठवणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतान सांगितले.बाहेरुनच कराव्या लागतात विविध प्रकारच्या तपासण्या पॅथॉलॉजी तपासणी, सोनोग्राफी तपासणी व औषधेही घ्यावी लागतात बाहेरुन रुग्णांना दररोज हजारो रुपयांचा भुर्दंड शासनानेच सुरू केले रुग्णालय परिसरात मेडीकल स्टोअर्स