शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

दहा संघटनांनी दर्शवला विरोध

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

वसमत : नगर पालिकेने शहराच्या हद्दीत बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

वसमत : नगर पालिकेने शहराच्या हद्दीत बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आजपर्यंत दहा संघटनांनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे. जनतेच्या भावनेची दखल घेत माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी न. प. तील सत्ताधाऱ्यांना कत्तलखान्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कत्तलखाना निविदा प्रक्रिया रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत.
नगरपालिकेने सर्व्हे नंबर ३९ वरील जागेवर कत्तलखाना उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. पालिकेत भाजपा- शिवसेनेची सत्ता आहे. व सध्या अध्यक्षपद भाजपाकडे आहे. असे असताना कत्तलखाना उभारणीचा निर्णय झाल्याने शहरातील नागरिक प्रचंड चक्रावून गेले आहेत. हा नियोजित कत्तलखाना होवू नये, पशुधन देशोधडीला लावण्याच्या या प्रकारास वसमतमधील नगरसेवकांनी पाठिंंबा देवू नये, अशी मागणी वाढत आहे.
कत्तलखान्याच्या विरोधात आजपर्यंत १० संघटनांनी दंड थोपटले आहेत. प्रशासनाकडे निवेदने सादर केली जात आहेत.
वसमत येथील गोवंश वाचवा कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन उपविभागीय कार्यालयासमोर सुरू केले आहे. तर श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम, श्री जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय तालुका सेवा समिती, जनहित मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक जागृत मंच, अ‍ॅड. संदीप भालेराव मित्रमंडळ, भ्रष्टाचार विरोधी समिती, राष्ट्रमाता सेवाभावी संस्था, गोहत्या विरोधी समिती, श्रीराम गोरक्षा दल आदी संघटनांनी कत्तलखान्याच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. नगर पालिकेला कत्तलखान्याची निविदा रद्द करण्यास भाग पाडू अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा अ‍ॅड. संदीप भालेराव यांनी दिला आहे. कत्तलखान्याचे समर्थक नगरसेवक व पदाधिकारी कोण आहेत, हे आता निविदा मंजूरीसाठी बोलाविलेल्या सभेतच स्पष्ट होणार असल्याने शहरातील नागरिक निविदा रद्द होतात की कत्तलखाना उभारणीसाठी सर्वांचे एकमत होते किंवा कसे? याकडे लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांच्या संतप्त भावना पाहता नगर पालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
कत्तलखाना होणार नाही
वसमत नगरपालिकेने कत्तलखान्यासाठी निविदा काढली असली तरी शहर व तालुक्यातील जनतेच्या भावना पाहता हा नियोजित कत्तलखाना होवू देवू नये व हा निर्णय रद्द करावा, अशा सूचना आपण नगराध्यक्ष व शिवसेना- भाजपाच्या सदस्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता वसमतमध्ये कत्तलखाना होणारच नसल्याची ग्वाही शिवसेनेचे माजीमंत्री
डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.