भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडले; मध्यप्रदेशच्या मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 13:45 IST2020-02-14T13:37:35+5:302020-02-14T13:45:21+5:30

मध्यप्रदेश येथून १५ दिवसांपूर्वीच कुटुंब कामानिमित्त आले होते

Tempo crushed two brothers; Madhya Pradesh family sinks into gloom | भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडले; मध्यप्रदेशच्या मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडले; मध्यप्रदेशच्या मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

शिऊर ( औरंगाबाद ) : वैजापूर - औरंगाबाद महामार्गावर असलेल्या शिऊर बंगला नजीक असलेल्या शुभम जिनिंगजवळ भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. सागर इसराम लोहारे (१३) व नवीन इसराम लोहारे ( ०८) असे मृतांची नावे असून ते मुळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश येथील मोहरदड ( ता.शेंदवा, जि बडवणी ) येथील इसराम लोहारे हे १५ दिवसांपूर्वी येथील शुभम जिनिंगमध्ये काम करण्यासाठी आले आहेत. ते पत्नी, दोन मुली आणि सागर व नवीन या दोन मुलांसोबत बालाजी जिनिंग परिसरात पालात राहतात. आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान सागर आणि नवीन आपल्या झोपडीतून वडील काम करत असलेल्या शुभम जिनिंगकडे चालत येते होते. जिनिंगजवळ असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. टेम्पो चालकाने घटनास्थळापासून पळ काढला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Tempo crushed two brothers; Madhya Pradesh family sinks into gloom