छत्रपती संभाजीनगर : एप्रिल महिन्यातील शेवटचा रविवार वाढलेल्या तापमानामुळे हॉट संडे म्हणून नोंदविला गेला. गत तीन वर्षांतील सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद २६ एप्रिलला झाली. किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअसवर राहिले. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने २९ एप्रिल ते १२ मेपर्यंत तापमान उच्चांकी राहील, असा इशारा दिला असून त्या दिशेने तापमान वाढणार असल्याचे रविवारच्या आकड्यांवरून स्पष्ट झाले.
शहर व परिसरात कडक उन्हाचा आणि उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानाचा पारा सकाळी लवकरच वाढण्यास सुरुवात होईल, दुपारनंतर कडक ऊन असेल.
तासनिहाय तापमान स्थितीसकाळी ८ ते १० तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान होते, नंतर उष्णता वाढण्यास सुरुवात झाली.दुपारी १२ ते ३ हा सर्वात उष्ण काळ ठरला. शहर व परिसरात ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे कमाल तापमान गेले. सायंकाळी ४ नंतर तापमानात हळूहळू घट झाली, मात्र सायंकाळीही उकाडा कायम होता.
हॉट संडेमुळे रस्ते निर्मनुष्यउष्णतेच्या लाटेमुळे दुपारी रस्ते ओस पडले होते. नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळले. एवढ्या उन्हात रविवारी स्कॉलरशिपची परीक्षा पार पडली. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान तापमानाचा उच्चांक होता.दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उष्ण वातावरण होते.
तीन वर्षांतील कमाल तापमानाची स्थिती.२९ एप्रिल २०२५ ते ११ मे २०२५: कमाल तापमान : ४२.६ ते ४२.२ अंश सेल्सिअस१८ एप्रिल २०२४ ते ११ मे २०२४: कमाल तापमान ४२.२ ते ४३.५ अंश सेल्सिअस१९ एप्रिल २०२३ ते १३ मे २०२३: कमाल तापमान ४०.६ ते ४१.८ अंश सेल्सिअस
बाष्प वाढल्याने उष्णतेत वाढ....बाष्प वाढल्याने उष्णतेत वाढ होत आहे. मे महिन्यातही असेच तापमान राहणे शक्य आहे. वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. सूर्योदयापासूनच उष्णता जाणवत आहे. पाण्याचे बाष्पाचे सातपट उष्णतेत रुपांतर होत असल्याने तापमान वाढते आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे टाळावे.-प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar experienced a scorching Sunday with a record-breaking 43.4°C, the highest in three years. The heatwave intensified, emptying roads. The weather department forecasts continued high temperatures until mid-May, urging residents to avoid midday sun exposure due to increased humidity.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में भीषण गर्मी, तापमान 43.4 डिग्री सेल्सियस दर्ज, जो तीन साल में सबसे अधिक है। लू के कारण सड़कें खाली रहीं। मौसम विभाग ने मई के मध्य तक उच्च तापमान की भविष्यवाणी की है, और निवासियों से बढ़ती आर्द्रता के कारण दोपहर में धूप से बचने का आग्रह किया है।