शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

११४ वर्षांची परंपरा जोपासणारा टेंबे गणपती

By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव गणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपतीची स्थापना होते. मात्र माजलगाव येथील टेंबे गणपतीची स्थापना निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते.

पुरुषोत्तम करवा , माजलगावगणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपतीची स्थापना होते. मात्र माजलगाव येथील टेंबे गणपतीची स्थापना निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते. महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या व नवसाला पावणाऱ्या टेंबे गणपतीने ११४ वर्षांपासून चालत आलेल्या ‘इको फ्रेंडली’ची संकल्पना चालू ठेवली आहे. माजलगाव शहरातील जोशी गल्ली येथे १९०१ साली काही युवकांनी मिळून जोशी गणेश मंडळाची स्थापना केली होती. या गणपतीची गणेश चतुर्थीला स्थापना करण्यात येत होती. गणपतीची स्थापना करण्यात आल्यानंतर एका महिलेने संतती होत नसल्यामुळे या गणपतीला नवस करुन माझ्या वंशाला दिवा मिळाल्यास गणपतीसमोर टेंबा लावील, अशा प्रकारचा नवस केला व तिला एका वर्षातच मूल झाले. तिने आपला नवस फेडण्यासाठी गणपतीला टेंबा अर्पण केला. तेंव्हापासून या गणपतीस नवसाला पावणारा ‘टेंबे गणपती’ असे नाव पडले आहे. निजाम राजवटीत कोणताही सण साजरा करण्यासाठी रजाकारांची परवानगी लागत असे. गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या सदस्यांनी रजाकारांची स्थापनेसाठी परवानगी न घेता मिरवणूक काढली. यावेळी ही मिरवणूक अडविण्यात आली व त्यांना स्थापनेचा परवाना मागितला. परंतु या मंडळाकडे परवाना नसल्याने काही सदस्य परवाना आणण्यासाठी हैदराबादला गेले. स्थापनेचा परवाना आणला. तोपर्यंत तीन-चार दिवस निघून गेले. यामुळे भाद्रपद एकादशीला या गणपतीची स्थापना करण्यात आली व याचे विसर्जन प्रतिपदेला करण्यात येऊ लागले. त्यामुळे कधी पाच तर कधी सहा दिवसांचा हा गणपती बसविण्यात येतो. राज्यात सर्वत्र प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या गणपतीची स्थापना मंडळाचे कार्यकर्ते करू लागले. मात्र या गणेश मंडळाने ७ ते ८ फुटाची मूर्ती शेणा, मातीपासून बनविली आहे. पापादेव गोंदीकर, बाळू कोथाळकर यांनी १५ दिवसांत ही मूर्ती बनविली. मंगळवारी याचे विसर्जन होणार असल्याचे पुजारी उदय जोशी, अध्यक्ष किशोर जोशी यांनी सांगितले.