वाहह साहेब! तहसीलदारांची बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चौकशी, स्वतः केली ट्रॅक्टरद्वारे पेरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:41 IST2025-06-24T12:41:14+5:302025-06-24T12:41:46+5:30
तहसीलदार सावंत हे सोमवारी दुपारी लासूरगाव येथे गेले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

वाहह साहेब! तहसीलदारांची बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चौकशी, स्वतः केली ट्रॅक्टरद्वारे पेरणी
वैजापूर : शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तहसीलदार सुनील सावंत यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून लासूरगाव येथे सोमवारी दुपारी पेरणी केली केली.
तहसीलदार सावंत हे सोमवारी दुपारी लासूरगाव येथे गेले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी दिवसभर शेतात थांबून शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच स्वतः ट्रॅक्टर चालवून पेरणी केली, तसेच रासायनिक खते, बियाणे यांचे भाव, दर्जा याबाबत आस्थेवाईकपणे चर्चा केली. हडस पिंपळगाव येथे शेत बांधाचे वाद मिटवले.
यावेळी मंडळ अधिकारी रिता पुरी, कल्पना गायसमुद्रे, तलाठी प्रवीण पाटील, ग्रा.पं. अधिकारी नानासाहेब राहिंज, कृषी अधिकारी वनिता खडगे, वसंतराव हुमे, रितेश मुनोत, अशोक नळे, बाबासाहेब हरिचंद्रे, कारभारी निघोटे आदींची उपस्थिती होती.