शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी धरले संस्थेला वेठीस !

By admin | Updated: January 9, 2015 00:52 IST

बीड : येथील राजे संभाजी बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मुकबधिर व मतिमंद संस्थेविरुद्ध उपोषण करणारे शिक्षक अनाधिकृतरित्या गैरहजर असून व्यवस्थापन कोलमडले आहे

बीड : येथील राजे संभाजी बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मुकबधिर व मतिमंद संस्थेविरुद्ध उपोषण करणारे शिक्षक अनाधिकृतरित्या गैरहजर असून व्यवस्थापन कोलमडले आहे. रोजंदारी कर्मचारी नेमण्याची वेळ संस्थेवर आली आहे. दरम्यान, चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे. रुख्माईगोविंद मतिमंद विद्यालयातील ९ तर मुकबधिर विद्यालयातील १२ कर्मचारी १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. यामध्ये शिक्षक, काळजीवाहक व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, उपोषणाला बसण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांनी संस्थेला कळविले नाही. शिवाय अनाधिकृतपणे गैरहजर राहिल्याने संस्थेच्या व्यवस्थापनावर परिणाम झाल्याचा दावा संस्था सचिव शिवाजी चव्हाण यांनी केला होता. त्याचबरोबर संस्थेने गैरहजर २१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून खुलासे मागविले आहेत. मात्र, अद्याप खुलासे आलेले नाहीत. दरम्यान, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सीईओ नामदेव ननावरे यांना संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार त्रयस्थ समिती नेमली आहे. उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, विस्तार अधिकारी गौतम चोपडे, कक्षाधिकारी जयलाल राजपूत यांची समिती चौकशी करून अहवाल सीईओंपुढे ठेवणार आहे. (प्रतिनिधी)रुख्माई- गोविंद मतिमंद व मुकबधिर विद्यालयाचे सचिव शिवाजी चव्हाण म्हणाले, २१ मार्च २०१४ रोजी तत्कालीन समाजकल्याण अधिकाऱ्यासह निरीक्षक व कर्मचाऱ्याची मी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. तेंव्हापासून संस्थेतील काहींना हाताशी धरुन अधिकाऱ्यांनी माझी अडवणूक सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांत फूट पाडून सूड उगविण्याचा अधिकाऱ्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्मचारी व संस्था पदाधिकारी यांच्यातील वाद आहे. त्याच्याशी आमचा संबध नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्रयस्थ समितीमार्फत संस्थेची चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीईओंनी समिती नेमली आहे, असे जि. प. समाजकल्याण अधिकारी एस. एस. शेळके म्हणाले. कोणाची अडवणूक आम्ही करण्याचा प्रश्न येतो कोठे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.