शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघटना राजकीय नकोत!

By admin | Updated: September 6, 2014 00:42 IST

औरंगाबाद : शिक्षक हा गौरवमूर्ती होता व कायम राहिला पाहिजे; परंतु शिक्षक संघटनांतील राजकारणामुळे हे क्षेत्रही बदनामीच्या नजीक पोहोचले आहे.

औरंगाबाद : शिक्षक हा गौरवमूर्ती होता व कायम राहिला पाहिजे; परंतु शिक्षक संघटनांतील राजकारणामुळे हे क्षेत्रही बदनामीच्या नजीक पोहोचले आहे. राजकीय पक्षाशी संलग्न शिक्षक संघटना नकोच आहेत. त्यामुळे शिक्षकांतही मोठे राजकारण शिरले आहे, असे परखड मत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे ६२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदा जारवाल होत्या.शिक्षक आमदार विक्रम काळे, उपाध्यक्षा विजया चिकटगावकर, शिक्षण सभापती बबन कुंडारे, बांधकाम सभापती डॉ. सुनील शिंदे, समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, पंचायत समिती सभापती सरसाबाई वाघ, रेखा जगताप, जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख आदींची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रभाकर पवारांचे ‘वार’शिक्षक सेनेचे प्रभाकर पवार यांना पुरस्कार वितरणप्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. यावेळी पवार यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रखर टीका केली. जिल्हा परिषदेचे सदस्य सिमेंट बंधाऱ्यावर चर्चा करतात, इकडच्या तिकडच्या चर्चा होतात; परंतु विद्यार्थी गुणवत्ता अभियानावर ते सभेत चकार शब्द काढत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला. आदर्श पुरस्काराच्या यादीवरही त्यांनी आक्षेप नोंदवून चुगली करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात, अशी बोचरी टीका केली. शेवटी मंचावर मान्यवरांनीच त्यांना आवरले व भाषण रोखण्यास भाग पाडले. त्यानंतर याच दिशेने कार्यक्रम पुढे सरकला. आदर्श शिक्षकांना पुरस्कारसतत चार वर्षांच्या खंडानंतर यावर्षी जिल्हा परिषदेने हे पुरस्कार घोषित केले. त्यामुळे सन २०११ पासून १४ पर्यंतच्या ६२ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना आनंद; व्यासपीठावरून केल्या गेलेल्या टीका- टिपण्या, कोपरखळ्या व सूचना हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.