शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ येथे गुरू-शिष्यांची मांदियाळी

By admin | Updated: July 13, 2014 00:38 IST

वेरूळ : वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या आश्रमात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

वेरूळ : वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या आश्रमात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. आलेल्या भक्तांनी प.पू. शांतीगिरी महाराजांचे पूजन केले. दहशतवादविरोधी पथकाचे अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनीही आश्रमास भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.सकाळपासूनच राज्यातील शिष्यांची शांतीगिरी महाराजांच्या आश्रमात गर्दी झाली होती. त्यात मनिंदरजितसिंग बिट्टा येणार असल्याने जागोजागी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. गुरुपूजनानंतर शांतीगिरी महाराजांनी भाविकांना उपदेश केला. ज्यांनी गुरू केला नाही, त्यांचा जन्म वाया गेला. जनार्दन स्वामींच्या दोह्यावर उकल करताना त्यांनी गुरूचे महत्त्व विशद केले.यानंतर मनिंदरजितसिंग बिट्टा यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रप्रेम कमी होत असून जागोजागी दहशतवाद निर्माण होत आहे, ही देशासाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रप्रेम, सर्वधर्म सहिष्णुता निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने गुरू करून त्याच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे, आदी मुद्यांवर त्यांनी उपदेश केला. शांतीगिरी महाराजांनी बिट्टा यांना पूजेचे भांडे भेट म्हणून दिले. यावेळी शिष्य केशवराव गोसावी यांनी शांतीगिरी महाराजांना टाटा सफारी गाडी भेट दिली. कार्यक्रमासाठी शांतीगिरी महाराजांसह जय बाबाजी परिवाराने परिश्रम घेतले.कैलास आश्रम, टाका स्वामी, पारेश्वर आश्रम, नाथ आश्रमातही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. कैलास आश्रमात शिष्यांनी महामंडलेश्वर भागवतानंदगिरीजी महाराजांचे पूजन केले. वेरुळात आज दिवसभर गुरू-शिष्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. (वार्ताहर)