शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीच्या योजना राबविलेल्या गावांमध्येच टँकरद्वारे पाणी

By admin | Updated: May 18, 2014 00:46 IST

बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़

बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे यापुढे टंचाई भागाची संबंधित तहसीलदार व बिडीओ यांनी पहाणी करून जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल सादर करताच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ यामुळे पाणीपुरवठा तात्काळ होण्यास मदत होणार आहे़ जिल्ह्यात आज स्थितीत ९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ यामध्ये ७४ टँकर खाजगी असून १९ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ सध्या उपलब्ध असलेली पाणीपुरवठा यंत्रणा बीड जिल्हयात अपुरी पडत असून आष्टी, शिरूर कासार, धारूर या तालुक्यातून टँकरची मागणी होत आहे़ जिल्ह्यातील नागरीकांची टँकर मागणी दिवसेंदिवस वाढत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा परिषेतील पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविलेल्या आहेत, परंतु अनेक योजना एकतर अर्धवट अवस्थेत आहेत़ नाहीतर पाणी पुरवठ्याच्या योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे संबधीत गावांना योजना देऊन देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही़ ही वास्तविकता बीड जिल्ह्यात पहावयास मिळते़ यापूर्वी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी देखील बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात चिंता व्यक्त करून ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावे़ अशा सुचना देखील संबधीत विभागाला दिल्या होत्या़ पाटोदा, शिरूर कासार, आष्टी व धारूर या तालुक्यांमध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे़ यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा अहवाल प्राप्त झाल्या शिवाय संबधीत गावाला टँकर देता येत नव्हते़ परंतु पाणीपुरवठा विभागाच्या बहुंताश योजनाचा गाशा गुंडाळलेला आहे तर ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत़ यामुळे येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैलची पायपिठ करावी लागत आहे़ यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबधीत तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांची पहाणी करून खरोखरच पाणी टंचाई असेल तर तात्काळ टँकरला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले़ जिल्हाधिकारी करणार प्रत्यक्ष पहाणी जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर व अंबाजोगाई तालुक्यातील टंचाईगस्त गावांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे स्वत: भेट देणार आहेत़ याबरोबरच पाणीटंचाई असलेल्या गावांना तात्काळ पाणीपुरवठा करण्यासंबधी सुचना दिलेल्या असल्याचे राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़