शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील तलाठी बेमुदत संपावर

By admin | Updated: April 26, 2016 23:48 IST

परभणी : तलाठी सज्जा व महसूल मंडळांची पुनर्रचना करावी, यासह सात विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे.

परभणी : तलाठी सज्जा व महसूल मंडळांची पुनर्रचना करावी, यासह सात विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कामकाज ठप्प पडले आहे.ग्रामस्थ आणि शासनाचा महसूल विभाग यांच्यातील दुवा म्हणून तलाठी काम करतात. या तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी परभणी जिल्हा तलाठी संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यापूर्वी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी मागण्या मान्य झाल्या नसल्याने परभणी जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तलाठी संवर्गातील नायब तहसीलदार अव्वल कारकून असे कर्मचारी २६ एप्रिलपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर गेले आहेत. सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर कराव्यात, सर्व्हरची स्पीड वाढवावी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौण खनिज वसुलीच्या कामात तलाठी संवर्गाला वगळावे, तलाठी तसेच मंडळ अधिकारी कार्यालय बांधून द्यावे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावीत आदी मागण्या तलाठी महासंघाने केल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी तलाठी महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तलाठी संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत काजे, देवेंद्रसिंग चंदेल, एन.आर.सोनवणे, के.पी.शिंदे, आर.के. पोले, एम.आर. जाधव, डी.यू. बोधाडे, व्ही.एस.वाणी, पी.बी. राखे आदींची उपस्थिती होती.या आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यातील २३८ तलाठी, ३२ मंडळ अधिकारी आणि तीन नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)