शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:27 AM

आवक-जावकला बदली झाल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता.

औरंगाबाद : तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत एका तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. लक्ष्मण नामदेव बोराटे (वय ४०, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

औरंगाबाद तहसील कार्यालयात लक्ष्मण बोराटे कार्यरत होते. त्यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनाचा विभाग होता. या विभागातून काही दिवसांपूर्वीच आवक-जावकला त्यांची बदली झाली. त्या ठिकाणीही त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या छळाला कंटाळून त्यांनी राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. बोराटे हे वृद्ध आई, पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासह राहत होते. त्यांची पत्नीही बँकेत नोकरीला असून, ती मुलासह माहेरी गेली होती. आई खालच्या खोलीत असताना त्यांनी वरच्या खोलीत गळफास घेतला. ही घटना सकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील कऱ्हाळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लक्ष्मण बोराटे यांना नातेवाइकांच्या मदतीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार देविदास राठोड करीत आहेत.

सीबीआय चौकशी करातलाठी लक्ष्मण बोराटे यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या नोटमध्ये तहसीलदार व इतर अशा १३ अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यात काही सहकाऱ्यांचाही समावेश आहे. वरिष्ठ अधिकारी नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यासाठी पैशांची मागणीही केली जात होती. त्यामुळे या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करावी, असा उल्लेखही नोटमध्ये असल्याचे समजते. बोराटे यांच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगही असल्याची माहिती समोर आली आहे.

नातेवाइकांचा मृतदेह घेण्यास नकारसुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. या मागणीसाठी सातारा पोलीस ठाण्यात रात्री साडेआठ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने जमाव जमला होता. नातेवाइकांनी घाटीत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासही नकार दिला. पोलीस ठाण्यात निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिठ्ठी वाचून दाखवलीपोलिसांनी जप्त केलेली सुसाईड नोट देण्याची मागणी नातेवाइकांनी पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी नकार दिला. नातेवाइकांच्या हट्टामुळे शेवटी पोलिसांनी मृताच्या पत्नीला चिठ्ठी वाचून दाखवली. संबंंधितांवर चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिले.

सर्वांची चौकशी होणार आत्महत्या केलेल्या ठिकाणी चार पानाची चिठ्ठी सापडली आहे. त्याची चौकशी पोलीस करीत आहेत. चिठ्ठीत उल्लेख असलेल्या सर्वांची चौकशी केली जाईल. त्यात संबंधितांचा सहभाग आढळल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.- सुरेंद्र माळाळे, निरीक्षक, सातारा पोलीस ठाणे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी