शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा काढून निराधारांचा तहसीलसमोर ठिय्या

By admin | Updated: July 22, 2014 00:14 IST

अंबाजोगाई: विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. निराधारांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अंबाजोगाई: २०१० पासून श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यांच्या लाभार्थ्यांचे रखडलेले अर्ज तात्काळ मंजूर करा, ग्रामीण भागातील विधवा महिलांना अन्न सुरक्षा लागू करा, यासारख्या विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. निराधारांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी नाही. हे रखडलेले काम मार्गी लावा, विधवा महिलांना अन्न सुरक्षा योजना लागू करा, रमजान महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थींना धान्याचे वाटप करावे, तहसील कार्यालयात एपीएल व बीपीएल कार्ड काढण्यासाठी पाचशे ते सहाशे रूपयांची मागणी केली जाते, त्यांचा बंदोबस्त करावा, यासारख्या विविध प्रमुख मागण्यांना घेऊन निराधार महिलांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.शहरातून निघालेल्या मोर्चात निराधार महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातून मोर्चा काढल्यानंतर निराधार महिलांनी तहसील कार्यालयासमोर येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य करा अन्यथा खुर्ची खाली करा, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या..., देत कशा नाहीत, दिल्याच पाहिजेत, यासाख्या विविध घोषणा देऊन महिलांनी आपला संताप व्यक्त केला. मानवलोक कार्यालयाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात डॉ. द्वारकादास लोहिया, बाबा जोशी, शाम सरवदे, संजना आपेट यांच्यासह निराधार महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू, या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे अश्वासन आ.पृथ्वीराज साठे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. आ. साठे यांनी निराधारांच्या आंदोलनात सहभागी होऊन मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे दिले. यावेळी आ.साठे, डॉ.लोहिया आदींची उपस्थिती होती.अर्ज निकाली काढण्याचे तहसीलदारांचे आश्वासननिवडणूक आचारसंहितेमुळे समितीची बैठक न झाल्याने अर्जाची मंजुरी रखडली होती. अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू असून लाभार्थीच्या खात्यावर रक्कम जमा होईल. यासाठी मंजुरी मिळालेल्या लाभार्थींनी बँक पासबुकांची प्रत तहसील कार्यालयात जमा करावी, असे आवाहन तहसीलदार राहुल पाटील यांनी केले आहे.(वार्ताहर)