शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष लोटूनही परीक्षा शुल्क मिळेना

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाभरातील शाळा-महाविद्यालयांची शासनाकडे प्रस्तावही दाखल केले. परंतु, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही शासनाकडून परीक्षा शुल्काचे सुमारे ६२ लाख रूपये अद्याप परत मिळालेले नाहीत. त्यामुळे इतर घटकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही शासनाच्या पोकळ घोषणेचा प्रत्येय येवू लागला आहे. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांसह पालकातून तीव्र संताप व्यक्त होवू लागला आहे. मागील तीन ते चार वर्षापासून उस्मानाबाद जिल्हा सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले. सदरील परिस्थिती लक्षात घेवून शासनाने टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये उस्मानाबादमधील गावांचाही समावेश झाला. अशा टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाकडून उपाययोजना जाहीर केल्या. त्यापैकीच एक म्हणजे, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाला तसे आदेशितही करण्यात आले. त्यानुसार शिक्षण विभागाने मार्च २०१५ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या सुमारे ४ हजार १७८ विद्यार्थ्यांचे शुल्क परत मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. यासाठी अनेकवेळा पाठपुरवाही करण्यात आला. परंतु, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही संबंधित विद्यार्थ्यांचे १४ लाख २० हजार ५२० रूपये एवढे शुल्क परत मिळालेले नाही. दरम्यान, हाच अनुभव २०१६ मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना येत आहे. या परीक्षेसाठी सुमारे १३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सदरील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण संचालकाकडे आणि त्यानंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाद्वारे सुमारे ४८ लाख ५८ हजार रूपयांची मागणी केली आहे. परंतु, सदरील रक्कम परत मिळालेली नाही. शासनाच्या या दुर्लक्षित कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.