शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: March 23, 2016 00:20 IST

नांदेड : हॉटेल व्यावसायिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर शैलजा स्वामी यांनी मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या आढावा बैठकीत दिले़

नांदेड : शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर शैलजा स्वामी यांनी मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या आढावा बैठकीत दिले़ त्याचवेळी शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याबाबतही निर्देश देण्यात आले़शहरातील वाढती अस्वच्छता आणि वाढते अतिक्रमण पाहता महापालिकेकडून मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मंगळवारी महापौर शैलजा स्वामी यांनी क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांची महापालिकेत बैठक घेतली़ उपमहापौर शफी अहमद कुरेशी, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले यांचीही प्रमुख उपस्थिती होती़ शहरात अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांकडून सार्वजनिक ठिकाणीच हॉटेलमधील वेस्टेज टाकले जात आहे़ याचा परिणाम त्या त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे़ असे असतानाही महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक व क्षेत्रीय अधिकारी मात्र हातावर हात ठेवूनच असल्याचे दिसत आहे़ ही बाब निदर्शनात आणून देताना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले़ शहरातील मुख्य रस्त्यांवरील फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे़ त्यात दुकानदारांसह किरकोळ व्यापाऱ्यांचाही समावेश आहे़ मुख्य रस्ते मोकळे करण्यासाठी आता मोहिमेची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले़ मोकाट जनावरांचाही शहरातील नागरिक व वाहतुकीला फटका बसत आहे़ शहरात अनेक भागात मोकळ्यावरच मांसविक्री होत आहे़ याकडेही त्यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे लक्ष देताना संबंधितांविरूद्ध कारवाई का करण्यात येत नसल्याचा सवाल त्यांनी केला़शहरात बहुतांश ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्सद्वारे होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी जी ठिकाणी महापालिकेने बॅनर्ससाठी निश्चित करण्यात आली आहेत तेथेच परवानगी द्यावी, अन्य ठिकाणी बॅनर्स लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले़(प्रतिनिधी)