शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध म्हणून ६० वर्षांचे सिंहावलोकन करा

By admin | Updated: October 13, 2016 01:10 IST

औरंगाबाद : रक्ताचा एक थेंबही न सांडता नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म अनुप्रवर्तन घडवून आणल्याने जगात मोठी धम्मक्रांतीच झाली आहे

औरंगाबाद : रक्ताचा एक थेंबही न सांडता नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म अनुप्रवर्तन घडवून आणल्याने जगात मोठी धम्मक्रांतीच झाली आहे. बौद्ध म्हणून ६० वर्षांचे सिंहावलोकन करा, असे आवाहन पूज्य भदन्त करुणानंद थेरो यांनी अध्यक्षीय समारोपप्रसंगी केले. धम्मरत्न मित्रमंडळातर्फे आयोजित अशोक विजयादशमी तथा धम्मदीक्षा षष्ठी समारंभात हडको येथे ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजेश रगडे होते. पूज्य भिक्खू सुगत बोधी थेरो यांनी धम्मदेसना दिली. कार्यक्रमास दौलत खरात, लक्ष्मण मगरे, राजू खरे, व्ही. के. वाघ, डॉ. रतन वाघ, दिलीप रगडे, मगन खंडाळे, पंडित बोर्डे, राजेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.बुद्ध धम्म विज्ञानावर आधारित आणि भारतीय मातीतील असल्याने बुद्धापासून सम्राट अशोकासह सखोल माहिती उदाहरणासह देऊन बौद्ध धम्माचे चक्र कसे अनुप्रवर्तित झाले हे त्यांनी समजावून दिले. जो कुणी कर्मकांड सोडून बौद्ध धम्माचे आचरण करील, ती व्यक्ती मोठी बनेल असेही ते म्हणाले. डॉ. राजेश रगडे यांनी विदेशातील बुद्ध धम्मातील स्थळांची माहिती देऊन उपासकांनी भिक्खू संघाला सोबत घेऊन बौद्धांची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी धम्म यात्रा काढावी. स्वत:च्या मुलाचे नाव बौद्ध संस्कृतीतील ठेवावे, घरातदेखील वास्तुकलेत बौद्ध संस्कृती असावी, त्यामुळे कुटुंबही बौद्धमय वातावरणात घडेल, असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाखरे यांनी केले. सुनील खरात यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मरत्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप रगडे, मिलिंद दाभाडे, यशवंत दाभाडे, प्रकाश कंकाळ, रमेश वानखेडे, उत्तमराव जाधव, भगवान गवई, विलास पांडे, बी. डी. सूर्यवंशी, सिद्धार्थ चोरपगार, प्रकाश पाखरे, सुमित ढोके, संतोष सोनवणे, वामनराव कांबळे, मिलिंद पातारे आदींनी परिश्रम घेतले.