शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर हल्लाबोल मोर्चा

By admin | Updated: August 7, 2014 01:26 IST

पालम : तालुक्यातील दलितांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी दलित संघटनांच्या वतीने ६ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे.

पालम : तालुक्यातील दलितांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी दलित संघटनांच्या वतीने ६ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे.
शहरातील बौद्ध विहारापासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. शनिवार बाजार, फळा-फरकंडा रस्ता, मुख्य चौक, बसस्थानक परिसर, नवा मोंढा या भागातील हल्लाबोल मोर्चा काढून तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता. या मोर्चात विजय वाकोडे, गौतम भालेराव, सुरेश गायकवाड, भैय्या भालेराव आदी सहभागी झाले होते.
पालम तालुक्यातील दलितांवर होणारा अत्याचार थांबवावा, अ‍ॅट्रॉसिटीच्या आरोपींना अटक करावी, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावाने करून देण्यात याव्यात, रमाई आवास योजनेतील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, संजय गांधी, श्रावणबाळ व इतर योजनेतील निराधारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून अनुदान वाटप करावे, अन्नसुरक्षा योजनेतील माल वेळेवर वाटप करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.
तहसील कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांना विजय वाकोडे, गौतम भालेराव, सुरेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच दलितांचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे. तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून मोर्चा मागे घेण्यात आला. या मोर्चात वैजनाथ हत्तीअंबिरे, संजय थिटे, निवृत्ती हत्तीअंबिरे, भीमशक्तीचे अरूण लहाने, राहुल गायकवाड, सुदर्शन हत्तीअंबिरे, बाबासाहेब एंगडे, काशिनाथ थिटे, अजय हनवते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
घोषणाबाजींनी शहर दणाणले
विविध दलित संघटनेच्या वतीने पालम शहरात बुधवारी सकाळी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या घोषणाबाजीमुळे शहर दणाणून गेले. शहरातील मुख्य रस्त्यावरून घोषणा देत कार्यकर्ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.