शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

राकाँवर टिकेची झोड

By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST

बीड : शेतकऱ्यांनी योग्य वेळी पीकविमा भरल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक पीकविमा ३३६ कोटींचा मंजूर झाला आहे. ही बाब स्वागतार्ह नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

बीड : शेतकऱ्यांनी योग्य वेळी पीकविमा भरल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक पीकविमा ३३६ कोटींचा मंजूर झाला आहे. ही बाब स्वागतार्ह नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. हा पीकविमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केले.शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित शेतकरी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर खा. डॉ. प्रीतम मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, संचालक फुलचंद मुंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, सर्जेराव तांदळे, गोविंद केंद्रे, सुभाष सारडा आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री मुंडे म्हणाल्या, जिल्हा बँकेवर प्रशासक नेमला असताना वसुली कमी व उपलब्ध ठेवी खर्च करण्यात आल्या. बँकेत केवळ १९ कोटी रूपये शिल्लक होते. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी स्व. मुंडे व मी समोरासमोर येऊन आरोप केले आहेत. माझ्यावर जे आरोप झाले आहेत त्या आरोपांना मी सामोरे गेली आहे. परंतु काही जण मागून आरोप करीत असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता सांगितले.भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, बँक बुडली असल्याचे माजी अध्यक्षांनी सांगितल्याने बँकेवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे बँकेच्या ठेवी वाढल्या नाहीत. जिल्हा परिषदेतील बोगस कामांचे बादशहा धनंजय मुंडे आहेत हे आपल्याला माहीत आहे.राष्ट्रवादी पक्ष नव्हे, टोळीमेळाव्यात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या बहारदार भाषणामुळे सर्व कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मरगळ दूर झाली. खोत यांनी भाषण सुरू केल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा दिला. पुढे त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मुलास आता कोणी मुली देत नाहीत. कारण ग्रामीण भागात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. राकाँ-काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी घोटाळे केले. मात्र, चेहऱ्यावर जरासाही लवलेश येऊ दिला नाही. आता भाजपाचे सरकार येऊन सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे तोच शरद पवार आरोप करीत आहेत. राकाँ नेत्यांनी वेगवेगळे घोटाळे केली, धरणे गिळंकृत केली, सर्वसामान्य माणूस देशोधडीला लावला. शेतकरी सुखी झाला पाहिजे, अशी भावना राष्ट्रवादी पक्षाची नव्हती. राष्ट्रवादी हा पक्ष नसून टोळी आहे. टोळीचे म्होरके शरद पवार यांना मी हल्ली अलीबाबा म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार, खासदार, पगारदारांना दुष्काळाचा फरक पडत नाही. दुष्काळाचा थेट परिणाम शेतकऱ्यावर होतो. रा. काँ. ने दलाल निर्माण केल्यामुळे ग्रामीण भागात तरूणांच्या हाताला काम नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी संघटनेने आंदोलन केले तर मंत्रीपदासाठी आंदोलन केले असे म्हटले जाते. जर शांत बसलो तर हिणवले जाते. त्यामुळे शरद पवारांनी आमची काळजी करू नये. तुमच्या कपाळाचे कुंकू का पुसलं (तुमची सत्ता का गेली ?) याचा विचार करा, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)शेतकरी मेळाव्याप्रसंगी डीसीसीचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बुडलेली बँक पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. या दृष्टीने कामकाज केले जात आहे. कर्जबाजारी लोकांना जोरजबरदस्ती न करता प्रेमाने सांगितल्यामुळे त्यांनी दीड कोटीहून अधिक रूपये जमा केले आहेत. आगामी काळात वसुली वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.