शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये बदल्यांचे सत्र

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या ३१ मेपूर्वीच कराव्यात, असे नियम केले आहेत.

औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या ३१ मेपूर्वीच कराव्यात, असे नियम केले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या १९६ अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश ३१ मे रोजी रात्री ८.३० वाजता जारी केले. बदल्या करताना प्रशासकीय कामकाज सोयीचे कसे होईल आणि जनतेची कामे मार्गी कसे लागतील हे पाहिले जाते. बदल्यांमध्ये घोळ होऊ नये, यासाठी आरोग्य संचालकांनी बदल्यांसाठी पात्र कर्मचार्‍यांची यादी घेऊन आरोग्य उपसंचालक, मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपिक यांना मुंबईला बोलवले होते. त्यानुसार हे अधिकारी दोन दिवस मुंबईत मुक्काम ठोकून होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजता १९६ अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले. या बदल्यांमध्ये ६५ अधिपरिचारिका, २१ अधिसेविका, १९ कनिष्ठ लिपिक, १६ औषधनिर्माता अधिकारी यांच्यासह अन्य तांत्रिक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या मराठवाड्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने आज बदल्यांचे आदेश जारी केले. आर. एम. साळोख यांची औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात नगर परिषद प्रशासन विभागात बदली झाली आहे. केज तहसीलमधील पी. डी. पुरी यांची बदली शिरूर अनंतपाळ येथे, के. एच. जगरवाल यांची गेवराई तहसील येथून पाटोदा येथे, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बी. पी. पन्हाळे यांची महसूल शाखेतून याच ठिकाणी रोहयो शाखेत, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पी. बी. यंदे यांची पुरवठा विभागातून याच ठिकाणी रोहयो शाखेत, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील पी. डी. जाधव यांची लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात, बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील लक्ष्मण धस यांची परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात, एस. सी. पाचपुते यांची माजलगाव तहसील कार्यालयातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात, के. पी. नरवडे यांची परतूर तहसील कार्यालयातून सिल्लोड तहसील कार्यालयात, शिवानंद बिडवे यांची उस्मानाबाद जिल्ह्यातून औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात, व्ही. डी. पाटोळे यांची सोनपेठ येथून मंठा तहसील कार्यालयात, पी. बी. सिरसेवाड यांची माजलगाव येथून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात, डी. बी. कोरडे यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून वैजापूर येथे आणि डी. के. संतपाळ यांची वैजापूर येथून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.