शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन शिक्षकांवर संशयाची सुई

By admin | Updated: February 15, 2016 00:19 IST

बीड : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) बहुचर्चीत पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांची नावे समोर येत आहेत. दोन्ही संशयित शिक्षक गायब आहेत

बीड : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) बहुचर्चीत पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांची नावे समोर येत आहेत. दोन्ही संशयित शिक्षक गायब आहेत. शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट शिक्षकांपर्यंत येऊन पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. राज्य शिक्षण परीक्षा परिषदेच्या वतीने १६ जानेवारी रोजी राज्यभर एकाचवेळी टीईटी परीक्षा झाली. पहिल्या सत्रात पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या १८ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका उत्तरांसह सोशल मीडियावरुन व्हायरल झाली होती. व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका जि.प. सीईओ नामदेव ननावरे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर धडकली होती. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी संतोष पवार यास पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या व्हॉटस्अ‍ॅपवर एका शिक्षकाने प्रश्नपत्रिका ‘फॉरवर्ड’ केली होती, असे तपासात पुढे आले आहे. पेपरफुटी प्रकरणाच्या ‘पापा’त आणखी एक शिक्षकाने त्याला ‘साथ’ दिलेली आहे. यापैकी एक जि. प. च्या बीडमधीलच शाळेत कार्यरत असून तो या प्रकरणापासून रजा न टाकता गायब आहे. दुसरा शिक्षक एका खासगी संस्थेतील शाळेत नोकरी करतो.पेपरफुटीसारख्या प्रकरणात शिक्षकांचीच नावे समोर येत असल्याने त्यांना ‘आदर्श’ कसे म्हणावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने उडालेला धुराळा जमिनीवर टेकलाही नाही तोच पेपरफुटीत शिक्षकांचे हात गुंतल्याचे पुढे येत असल्याने शिक्षण वर्तुळ हादरुन गेले आहे. पेपर कसा फोडला हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)