पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:21 IST2022-12-08T15:20:36+5:302022-12-08T15:21:28+5:30

संशयाने पछाडलेल्या पतीने दोन दिवसांपूर्वी पत्नीचे डोक्यावरचे केस कापून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला.

Suspicion haunted the husband; First he cut his wife's hair, then killed hher by beating him in front of his son | पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले

पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले

वाळूज महानगर (औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरुन रात्रभर बेदम मारहाण करुन पत्नीचा खून केल्याची थरारक घटना बुधवारी मध्यरात्री घाणेगावात घडली. लक्ष्मीबाई संतोष जाधव (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती संतोष जाधव यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

घाणेगाव येथील संघर्षनगरात वास्तव्यास असणाऱ्या संतोष जाधव याने १७ वर्षापूर्वी लक्ष्मी हिच्या सोबत गंधर्व विवाह केला होता. लक्ष्मीबाई हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी तर संतोष पासून आदर्श (१४) नावाचा एक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार केल्यानंतर संतोष चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला सतत मारहाण करू लागला . दुसऱ्या लग्नानंतर संसार मोडू नये म्हणून लक्ष्मी अत्याचार सहन करीत होती. मात्र, संतोषच्या वर्तवणूकीत फरक पडत नव्हता. 

दरम्यान, संशयाने पछाडलेल्या संतोषने दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीचे डोक्यावरचे केस कापून विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तर बुधवारी संतोष मुलगा आदर्शसमोर लक्ष्मीला रात्रभर मारहाण केली. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संतोषने लोखंडी सळईने डोक्यात वार केल्याने लक्ष्मी गंभीर जखमी होऊन मृत झाली. लक्ष्मी मृत झाल्याची खात्री पटताच संतोषने आपल्या आई-वडिलांशी संपर्क करुन खून केल्याचे सांगितले.

आरोपी पती जेरबंद, मुलाने सांगितली हकीकत
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक स्वाती उचित, अशोक इंगोले, राहुल निर्वळ, अधाणे, पोकॉ. कच्चे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी संतोष जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगा आदर्श यानेही पोलिसांना वडिलाने रात्रभर मारहाण करुन आई लक्ष्मीचा खून केल्याचे सांगितले. सहायक पोलिस आयुक्त दीपक गिऱ्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहिनी केली. 

Web Title: Suspicion haunted the husband; First he cut his wife's hair, then killed hher by beating him in front of his son