शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

‘जोडी हजार रुपये’चा सूर्यवंशी देत होता मंत्र

By admin | Updated: May 17, 2016 00:35 IST

औरंगाबाद : जीवनात पैसा कसा कमवायचा, करोडपती कसे व्हायचे, याचा मंत्रच ‘ट्रू लाईफ’ कंपनीचा सर्वेसर्वा दीपक सूर्यवंशी रविवारी रात्री औरंगाबादेतील गुंतवणूकदारांना देत होता.

सिंगापूर टूरचेही आमिष : चमत्कारी अंगठी फक्त ८० रुपयांचीचऔरंगाबाद : जीवनात पैसा कसा कमवायचा, करोडपती कसे व्हायचे, याचा मंत्रच ‘ट्रू लाईफ’ कंपनीचा सर्वेसर्वा दीपक सूर्यवंशी रविवारी रात्री औरंगाबादेतील गुंतवणूकदारांना देत होता. तुम्ही देवाचा जप करू नका, जप करा फक्त ‘जोडी हजार’चा. एक जोडी आणून आमच्याकडून हजार रुपये घ्या. ‘जेवढ्या जास्त जोड्या, तेवढा पैसा जास्त’असा मंत्र त्याने दिला. गुंतवणूकदार म्हणून पोलीस येथे बसले आहेत, असा जराही संशय त्याला आला नाही.साखळी पद्धतीने सभासदांची संख्या वाढवून नाशिकची ‘ट्रू लाईफ’ कंपनी सामान्यांना गंडा घालण्याचा उद्योग करीत असल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे पोहोचल्या होत्या. आर्थिक फसवणुकीच्या घटनेत कंपनीचा म्होरक्या शक्यतो हाती लागत नाही. पैशांच्या जोरावर तो विदेशात लपून बसतो, असा पोलिसांचा अनुभव होता. त्यामुळे ‘ट्रू लाईफ’च्या एजंटांवर कारवाई करण्याऐवजी थेट म्होरक्यालाच ताब्यात घेण्याचे त्यांचे मनसुबे होते. त्यासाठी दीपक सूर्यवंशी औरंगाबादेत येण्याची त्यांना प्रतीक्षा होती.‘ट्रू लाईफ’च्या वर्धापन दिनानिमित्त सूर्यवंशी औरंगाबादेत येणार असून, तापडिया नाट्यमंदिरमध्ये तो गुंतवणूकदारांचा मेळावा घेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस गुंतवणूकदार म्हणून मेळाव्यात सहभागी झाले होते. शहरातील १८०० पेक्षा जास्त नागरिक यावेळी उपस्थित होते. साखळी पद्धतीने जास्तीत जास्त सभासद मिळवून देणाऱ्याचे सूर्यवंशीच्या हस्ते सत्कारही झाले. स्टेजवर येताच ‘झिंगाट’ सारख्या गाण्यांवर नृत्य करण्याचा आग्रहदेखील तो करीत होता.असे व्हा करोडपतीकरोडपती होणे सोपे असल्याचा दावा करून त्यासाठी काय करावे, याचे धडे चव्हाण देत होता. सभासद म्हणून एक जोडी (दोघे जण) आणल्यास आमच्याकडून रोख हजार रुपये दिले जातात. तुम्ही जेवढे जास्त सभासद आणाल तेवढी कमाई वाढेल. यापुढे देवाचा जप करू नका, ‘जोडी हजार रुपये’ हाच जप करीत जा. तोच तुम्हाला करोडपती बनवेल, असा सल्लाही त्याने दिला.फ्लॅट अन् सिंगापूर वारीसिल्व्हर ते क्राऊन क्लब, अशी सभासदांची उतरंड त्याने समजून सांगितली. तुम्ही क्राऊन क्लबमध्ये आल्यास अलिशान फ्लॅट दिला जाईल, तसेच सिंगापूरची टूरही मिळेल, असे आमिषही त्याने दाखविले. योजनेत निकृष्ट दर्जाच्या वस्तूसभासद बनलेल्यांना ‘ट्रू लाईफ’कडून एक अंगठी दिली जात असे. चार हजार रुपये किमतीची पंचधातूची ही अंगठी चमत्कारी असल्याचे सांगितले जात होते. ही अंगठी तुमचे जीवन बदलेल, असा दावा सूर्यवंशी करीत होता. अंगठीप्रमाणेच भाग्यशाली ब्रासलेटही तो देत असे. प्रत्यक्षात या अंगठीचे खरे मूल्य शंभर रुपयांच्या आत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाच प्रकारे सूर्यवंशीकडे गॅस सेफ्टी मशीन, वॉटर प्युरिफायर आदी वस्तूही अत्यंत निकृष्ट दर्जाच्या होत्या. २६ मेपर्यंत कोठडीफसवणूकप्रकरणी अटक केलेल्या दीपक सूर्यवंशी व इतर सहा आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता २६ मेपर्यंत आरोपींचा मुक्काम कोठडीत असणार आहे.‘एज्युकेशन पॅकेज’चा मुलामाकार्यक्रमानंतर सर्व नागरिक आपापल्या घरी परतले. सूर्यवंशी, त्याचे सहकारी निघण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी पोलीस धडकले. त्यांनी आपली खरी ओळख देताच सर्वांचेच धाबे दणाणले. अंगठी, ब्रासलेटसाठी आपण चार हजार घेत नव्हतो, तर सभासदांना विविध कोर्सचे ‘एज्युकेशन पॅकेज’ही देणार होतो, असा दावा त्याने केला.