शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकार्‍यांंकडून क्रीडा संकुलाची पाहणी

By admin | Updated: May 20, 2014 01:15 IST

उस्मानाबाद : येथील श्री तुळजा भवानी जिल्हा क्रीडा संकुलाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने ‘तुळजा भवानी क्रीडा संकुलाची लागतेय वाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़

उस्मानाबाद : येथील श्री तुळजा भवानी जिल्हा क्रीडा संकुलाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने ‘तुळजा भवानी क्रीडा संकुलाची लागतेय वाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ़प्रशांत नरनवरे यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली़ पाहणीदरम्यान झालेल्या कामांची माहिती घेत संबंधित गुत्तेदाराला दुरूस्तीच्या सूचना देण्यासह कारवाईचा इशारा देण्यात आला़ जिल्हाधिकार्‍यांनीच या संकुलाच्या कामाकडे लक्ष दिल्याने खेळाडूंमधून समाधान व्यक्त होत आहे़ शैक्षणिकनंतर क्रीडा क्षेत्रानेच उस्मानाबाद जिल्ह्याचा नावलौकिक राज्यासह देशाच्या पटलावर केला आहे़ मात्र, शहरासह जिल्ह्यातील खेळाडुंना सरावासाठी असलेल्या तुळजाभवानी क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपयांची कामे करूनही त्याचा खेळाडुृंसाठी अपेक्षित उपयोग होताना दिसून येत नाही़ मैदानाची झालेली दूरवस्था, वयोवृध्दांसाठी बनविण्यात आलेला वॉकवे, पाण्याचा अभाव, जलतरण तलावाची दुरवस्था, कुलूपबंद असलेले लॉनटेनीस मैदान, जमिनीखाली असलेले लाखो रूपयांचे वायर, विद्युत खंबाचा खेळखंडोबा, गटारीत टाकलेले पाईप, तुंबलेल्या गटारी आदी विविध प्रश्नांबाबत ‘लोकमत’ने १२ मे रोजी ‘तुळजाभवानी क्रीडा संकुलाची लागतेय वाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ़ नारनवरे यांनी क्रीडा संकुलाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून विविध विभागाच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली़ बैठकीनंतर त्यांनी मैदानावर तेथील परिस्थितीची पाहणी केली़ संबंधित उपस्थित अधिकार्‍यांना जलतरण तलावाचे लिकेज न निघण्याचे कारण गुत्तेदाराला विचारून ते काम करून घेण्याच्या सूचना दिल्या़ तसेच गुत्तेदार दुरूस्तीची कामे करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचनाही दिल्या़ तसेच मैदानात येणारे खेळाडू, जीममध्ये येणारे खेळाडू, मिळणारे उत्पन्न याचा लेखाजोखा चोख ठेवण्याच्या सक्त सूचनाही जिल्हाधिकारी डॉ़नारनवरे यांनी दिल्या़ यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, क्रीडा कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते़ जिल्हाधिकार्‍यांनी मैदानाच्या दूरवस्थेकडे लक्ष घातल्याने खेळाडुंमधून समाधान व्यक्त होत असून, मैदानावरील समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे़