सुपारीकिलर तिघे जेरबंद

By Admin | Updated: September 13, 2015 00:03 IST2015-09-12T23:58:49+5:302015-09-13T00:03:02+5:30

तुळजापूर : खून प्रकरणात कर्नाटकातून फरार असलेल्या तीन आरोपींना तुळजापूर पोलिसांनी जेरबंद केले़ ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली़

Supariquilar Three Tailored | सुपारीकिलर तिघे जेरबंद

सुपारीकिलर तिघे जेरबंद


तुळजापूर : खून प्रकरणात कर्नाटकातून फरार असलेल्या तीन आरोपींना तुळजापूर पोलिसांनी जेरबंद केले़ ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली़
कर्नाटकातील मदन हिप्परना पोलीस ठाण्यांतर्गत गुलबर्गा येथील श्रीदेविद्रप्पा सातप्पा श्रीधरगंये यांची सुपारी घेऊन ४ सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता़ या प्रकरणातील आरोपी चंद्रकांत सातप्पा गदवे, हणमंत श्रीमंत होनाळी व श्रीशैल श्रीमंत मनोठो (सर्व रा़साकीनिवाल), हे फरार होते़ खून प्रकरणातील आरोपी तुळजापूर येथील साईप्रसाद लॉजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोनि ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि जमदाडे, पोउपनि किरवाडे, पोउपनि रविकांत भंडारी, पोउपनि मोनाली पवार, पोकॉ योगेश सूर्यवंशी, पोकॉ गोविंद पवार यांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले़ तिघांनाही कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

Web Title: Supariquilar Three Tailored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.