शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

रविवार बाजारातील गर्दी ओसरली

By admin | Updated: October 6, 2014 00:41 IST

औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती.

औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती. सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरूअसल्याने ग्रामीण भागातील ग्राहक या बाजाराकडे फिरकलेच नाहीत. त्यात दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने आलेले ग्राहकही पांगले. याचा आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला. भाजीपाल्यापासून ते टीव्हीपर्यंत सबकुछ जिथे मिळते, त्या मोंढ्यातील जाफरगेट परिसरात भरणाऱ्या रविवारच्या बाजाराची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. दर रविवारी विक्रेते व ग्राहक यांची येथे एवढी गर्दी होते की, परिसरात पायी चालणेही कठीण होऊन जाते. लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या आठवडी बाजारात आज मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. सकाळपासूनच या परिसरात तुरळक ग्राहकी दिसून आली. दुपारनंतर गर्दी वाढत असते; पण तसे झाले नाही. रविवारी या बाजारातून पायी चालणे कठीण असते; पण आज अनेक जण वाहन घेऊन थेट येथे आले होते. वर्दळच नसल्याने वाहतूक जाम होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यात दुपारी ४ वाजेनंतर पावसाने हजेरी लावली. परिणामी, बाजारात असलेली ग्राहकीही पांगली. यामुळे अनेकांनी सायंकाळ होण्याच्या आतच गाशा गुंडाळला. भाजी विक्रेते हरिभाऊ जोगदंड यांनी सांगितले की, आज ९०० रुपयांची भाजी विक्रीसाठी आणली होती. सायंकाळपर्यंत सर्व भाजी विक्री होत असते. मात्र, आज ३४० रुपयांचाच धंदा झाला. कटलरीचे साहित्य विकणारे शेख मोहंमद म्हणाले की, निवडणुकीचा परिणाम बाजारावर दिसून आला. विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकी हमाल, कष्टकरी नागरिक आज दिसलेच नाहीत. अनेक जण निवडणूक प्रचारात काम करीत असल्याचे कळाले. नईम पठाण या ग्राहकाने सांगितले की, दर आठवडी बाजारात भाजी व अन्य साहित्य खरेदीसाठी येथे येत असतो. मात्र, आज गर्दी कमी असल्याचे आढळून आले. एरव्ही धक्के खात येथून जावे लागत असे; परंतु आज मोकळे फिरून आम्ही भाज्या व अन्य साहित्य खरेदी केले.