सोयगावात तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:12 IST2019-05-31T16:10:05+5:302019-05-31T16:12:06+5:30
तरुणाकडे पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली.

सोयगावात तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील जवळा येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. दिलीप किसन बावसकर ( 32 ) असे मृताचे नाव असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
जवळा शिवारात पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत दिलीप किसन बावसकर या तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.तरुणाकडून पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली. पोलिसांनी सुसाईड नोट अधिक तपासासाठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवली आहे. मात्र नोट मध्ये जिल्हा बँकेच्या व्यवस्थापक सह अन्य दोघांची नावे यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जी,व्ही शेळके, दुर्गेश राजपूत, जमादार बबन धन आदी करत आहेत.