पंधरा दिवसापूर्वी शहरात आलेल्या तरूण कामगाराची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 23:06 IST2023-04-08T23:05:24+5:302023-04-08T23:06:09+5:30
पोलिसांनी सांगितले की, हिरकेश हा त्याचा रूमपार्टनर किरण बाबूराव जाधव यांच्यासाेबत राहात होता. तो खाजगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामाला जात होता.

पंधरा दिवसापूर्वी शहरात आलेल्या तरूण कामगाराची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : रांजणगाव शेणपूंजी येथे काम धंद्यासाठी पंधरा दिवसापूर्वीच शहरात आलेल्या हरिकेश ज्ञानेश्वर पतंगे (२४, मूळ रा. दिग्रस, कोंडूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता समोर आली.पोलिसांनी सांगितले की, हिरकेश हा त्याचा रूमपार्टनर किरण बाबूराव जाधव यांच्यासाेबत राहात होता. तो खाजगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामाला जात होता.
शनिवारी हरिकेश घरीच होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास किरण खोलीवर परतला तेव्हा हरिकेशने खोलीचे दार आतून बंद केल्याचे दिसले. आवाज देऊनही तो दार उघडत नसल्याने शेवटी या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी दार तोडून आत जाऊन पाहिले असता हरिकेशने गळफास घेतल्याचे दिसले. या नंतर त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाणयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.