औरंगाबाद : १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुं दनगर भागात घडली. किरण गुलाब चव्हाण (१९), असे विद्यार्थिनीचे नाव आहे.किरणने १२ वीची परीक्षा दिली होती आणि मंगळवारी १२ वीचा निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे किरण आनंदात होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास आई-वडील घरामध्ये जेवण करीत असताना किरण बेडरूममध्ये गेली व तिने आतून दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर बराच वेळ तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी किरणला आवाज दिला; परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता किरणने गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबियांनी तात्काळ फासावरून उतरवून तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासून २.४५ वाजता किरणला मृत घोषित केले. किरण १२ वीमध्ये उतीर्ण झाली की अनुत्तीर्ण झाली, याबाबतही कुटुंबियांना काहीही माहिती नाही. निकालाचा ताण घेतल्यानेच तिने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक वनिता चौधरी करीत आहेत.
इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:11 IST
१२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुं दनगर भागात घडली. किरण गुलाब चव्हाण (१९), असे विद्यार्थिनीचे नाव आहे.
इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
ठळक मुद्देमुकुंदनगरातील घटना : आत्महत्येच्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू