आत्महत्या प्रकरण; चौघांना कोठडी

By Admin | Updated: January 19, 2015 00:57 IST2015-01-19T00:32:52+5:302015-01-19T00:57:52+5:30

पाटोदा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. रविवारी चार जणांना अटक झाली. त्यांना शिरुर न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Suicide Case; Four-in-one | आत्महत्या प्रकरण; चौघांना कोठडी

आत्महत्या प्रकरण; चौघांना कोठडी

पाटोदा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. रविवारी चार जणांना अटक झाली. त्यांना शिरुर न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
राणी आजिनाथ डोळे (वय २४ रा. डोळेवाडी ता. शिरुर) ही हिववाहिता आकाश (वय ६) व आदर्श (वय ३) या दोन मुलांसह १० जानेवारीपासून बेपत्ता होती.शुक्रवारी या मायलेकरांचे मृतदेह विहिरीत आढळले होते. विवाहितेने आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले होते. पती आजिनाथ उर्फ पप्पू डोळे, सासरा शहादेव डोळे, सासू आश्रूबाई डोळे, दीर संभाजी डोळे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाटोदा ठाण्यात गुन्हा नोंद झालेला होता. (वार्ताहर)

Web Title: Suicide Case; Four-in-one