शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजारपैकी २०० हेक्टरवर ऊस

By admin | Updated: May 10, 2016 00:02 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी,

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी, ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याची स्थिती वाळवंटासारखी झाली आहे़ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव यासारखे मोठे प्रकल्प यंदा कोरडेठाक पडले आहेत़ परिणामी, भूजल पातळी सहा मीटरने खालावली आहे. तालुक्यातील ३४ हजार ५०० हेक्टर्स जमिनीपैकी जवळपास २० हजार हेक्टर्स जमीन काळी कसदार असून, घरणी आणि मांजरासारख्या मोठ्या नद्यांचा प्रत्येकी १२ कि.मी. चा किनारा लाभला आहे. तालुक्याच्या चार बाजूस चार प्रकल्प झाल्याने तालुक्यात सिंचन क्षेत्रास मोठा वाव मिळाला आणि साडेतीन हजार हेक्टर्समध्ये उसाची लागवड झाली होती़ यंदा सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. एकंदर, दुष्काळी परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने साडेतीन हजार हेक्टर्समधील उसाचे क्षेत्र शेतकऱ्यांना नाविलाजाने मोडीत काढावे लागले़(वार्ताहर)वैरणीसाठी वापर... सर्वाधिक उस उत्पादक शेतकरी अंगण गुणाले, धोंडिराम कारभारी, विठ्ठल पाटील म्हणाले, पशुधन जगविण्यासाठी उसाचा वैरण म्हणून गेली तीन महिन्यांपासून वापर सुरू आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. आता केवळ २०० हेक्टर्स ऊस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ग्रीन बेल्ट नाहिसा झाल्याचे तालुका कृषी अधिकारी डी.बी. सुतार, बिभीषण काळदाते, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.