शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पाणबुडी मोटार वाटपात गैरप्रकार

By admin | Updated: June 19, 2014 00:21 IST

उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये अनुदानावर पाणबुडी मोटार वाटप करण्यात आली आहे

उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये अनुदानावर पाणबुडी मोटार वाटप करण्यात आली आहे. मात्र सदरील मोटारी वितरित करताना शासन निकष आणि नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर याप्रकरणाची स्पॉट चौकशी करण्याचे आदेश सर्वसाधारण सभेमध्ये देण्यात आले होते. चौकशीअंती विद्युत मोटारी वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. तत्कालीन समाजकल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दोघांची विभागीय चौकशी तर दोघांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हा प्रकार सर्व प्रथम ‘लोकमत’ ने उजेडात आणला होता.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मागासवर्र्गीय शेतकऱ्यांना समाजकल्याण विभागांतर्गत मोटारी वाटप करण्यात येतात. असे असतानाच तुळजापूर तालुक्यात मात्र धनदांडग्या व्यक्तींना मोटारी वाटप केल्याची तक्रारी झाल्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. मात्र सुरुवातीच्या दोन्हीही समित्यांनी गोल गोल अहवाल सादर केला होता. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये उस्मानाबाद पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली होती. त्यांनी या सर्व प्रकाराची स्पॉट चौकशी केली होती. चौकशीअंती तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशीअंती मोटारी वाटप करताना बहुतांश निकष धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सदस्यांच्या आरोपानुसार धनदांडग्यांना मोटारी वाटप केल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे काही जणांना दुबार लाभ दिल्याचेही उघड झाले. तर काहींच्या शेतात विहिरी नसतानाही त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्यात आली. त्यांनी या मोटारी सधन शेतकऱ्यांना विकून टाकल्या. असे एक ना अनेक प्रकार यातून समोर आले आहेत. त्यावर हे प्रकरण गांभिर्याने घेत जिल्हा परिषदेकडून तत्कालीन समाजकल्याण अधिकारी कुशाल गायकवाड आणि गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. तर विस्तार अधिकारी (समाजकल्याण) टी.एम. कांबळे आणि कृषी अधिकारी डी.एम. मुळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. हा सर्व गैरप्रकार ‘लोकमत’ ने सर्वप्रथम उजेडात आणून वेळोवेळी पाठपुरावाही केला होता.त्यानंतरच चौकशीचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)अन्य तालुक्यांचीही चौकशी करातुळजापूर प्रमाणेच अन्य तालुक्यामध्येही अशाच प्रकारे धनदांडग्यांनी मोटारी लाटल्याचे बोलले जाते. त्यामुळे या तालुक्यातील मोटारी वाटप प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.