शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी अपघात योजनेलाच ‘अपघात’

By admin | Updated: May 31, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिली जाते.

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिली जाते. यासाठी शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरु केली. मात्र या योजनेलाच अपघात झाला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आॅक्टोबर २०१३ पासून ते आजतागायत ४५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर केले. मात्र पैसेच नसल्याने संबंधित कुटुंबियांना जिल्हा परिषदेला खेटे मारण्याची वेळ आली आहे. शासनाच्या वतीने राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तातडीने अनुदान मिळत गेले. मात्र मागील काही महिन्याचा विचार केला असता, पैशाअभावी लाभार्थ्यांना अनुुदानाची प्रतिक्षा करावी लागत आहे. ७ फेब्रुवारी २०१४ रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान पहिली ते आठवी पर्यंतचे पाच तर नववी ते बारावी या वर्गातील ३ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र ७ महिन्यांचा कालावधी शासनाकडून एक छदामही उपलब्ध झालेला नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. ४ ते ५ वेळा पत्रही पाठविण्यात आली. मात्र शिक्षण संचालक कार्यालयाकडून केवळ आश्वासन दिले जात आहे. निधी उपलब्ध होताच वर्ग केला जाईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, २० मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. समितीसमोर प्राथमिकचे १२ तर माध्यमिकचे ४ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी १ प्रस्ताव त्रुटी असल्यामुळे अपात्र ठरला. उर्वरित १५ प्रस्तावांना या समितीने मंजुरी दिली आहे. उपरोक्त लाभार्थ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. एकूण लाभार्थ्यांचा विचार केला असता, ३० लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम लागणार आहे. याची मागणी शासनाकडे केली आहे. शिक्षण संचालकांना याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहारही झाला आहे. परंतु, या पत्रांना केराची टोपली दाखविल्याचे दिसते. (प्रतिनिधी) लाभार्थ्यांत नाराजी प्रस्तावाला मान्यता मिळून अनुदानही मंजूर झाले आहे. मात्र शासनाकडून मागणी केलेली रक्कम मागील सहा ते सात महिन्यापासून उपलब्ध झालेली नाही. शिक्षण विभागाकडूनही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अनुदानाच्या रक्कमेसाठी संबंधित लाभार्थ्यांचे कुटुंबिय शिक्षण विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र शिक्षण विभागाकडूनही संबंधित लाभार्थ्यांना निधी आल्यानंतर वितरित करु, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या कुटुंबियातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.