शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांसाठी लढणारे कदम, तर कुशल संघटक अमरनाथ राजूरकर

By admin | Updated: April 18, 2016 00:43 IST

नांदेड : खा़ अशोकराव चव्हाण यांना समर्थ साथ देत बी़ आऱ कदम यांनी सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केली

नांदेड : राज्यात काँग्रेसची सत्ता नाही़ यावेळी पक्षाचे संघटन मजबूत करून माजी मुख्यमंत्री तथा खा़ अशोकराव चव्हाण यांना समर्थ साथ देत बी़ आऱ कदम यांनी सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केली आहे़ तसेच आ़अमरनाथ राजूरकर हे कुशल व उत्तम संघटक असल्याचे प्रतिपादन आ़अमिता चव्हाण यांनी रविवारी येथे केले़ नांदेड जिल्हा काँग्रेस कार्यालयात आ़ अमरनाथ राजूरकर, नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम यांच्या सत्कार सोहळ्यात आ़ चव्हाण बोलत होत्या़ व्यासपीठावर माजीमंत्री आ़ डी़ पी़ सावंत, नामदेवराव केशवे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय देशमुख लहानकर, मंगला निमकर, गोविंदराव नागेलीकर, भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके आदींची उपस्थिती होती़ आ. अमिता चव्हाण म्हणाल्या, बी. आर. कदम यांना सर्वसामान्यांसाठी लढताना मी अनेकदा पाहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी प्रदेश सरचिटणीससारख्या महत्वाच्या पदावर निवड करत काम करण्याची संधी दिली आहे. आ. डी़ पी़ सावंत म्हणाले, गल्ली ते दिल्लीदरम्यान सामान्यासाठी आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून कदम यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांची ओळख, आपुलकी यामुळे ते परिचित आहेत. सत्कार व स्वागताप्रसंगी प्रभारी अध्यक्ष आ. राजूरकर म्हणाले, बी. आर. कदम यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमवेत चांगले काम केले़ त्यांच्यासारखाच सर्वसामान्यांना न्याय देणारा जिल्हाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे निवडणार असून तोपर्यंत आपण हंगामी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहोत. यावेळी बी. आर. कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास मसूद खान, शमीम अब्दुल्ला, बलवंतसिंघ गाडीवाले, डॉ. श्याम पाटील तेलंग, बालाजी पांडागळे, पप्पू पाटील कोंडेकर, चंद्रकांत भुक्तरे, नगरसेवक विजय येवनकर, मंगला धुळेकर, अनिता हिंगोले, किशोर स्वामी, दुष्यंत सोनाळे, डॉ. एन. के. सरोदे, प्रवक्ते संतोष पांडागळे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)