शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर अंधार कायम

By admin | Updated: October 9, 2014 00:51 IST

औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. दिवाळीचा सण जवळ येत आहे, तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे.

औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. दिवाळीचा सण जवळ येत आहे, तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. पथदिव्यांसाठी ११२ कोटी रुपयांतून बीओटीवर मनपाने कं त्राट दिले आहे. मात्र, ते काम अजून कागदावरच आहे. एन-५, बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निराला बाजार ते जि.प. मैदानापर्यंत या मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत, तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजी चौक, एन-१२ सिडको- हडकोतील रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत. मनपाने ११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया या संस्थेला दिले आहे. जुन्या विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतरच वरील कंपनी काम सुरू करील. मनपाने ११ नोव्हेंबरपर्यंत विनवॉक कंपनीला मुदत दिली आहे. शहरातील रस्ते दिवाळीमध्ये तरी प्रकाशमान होणार की नाही, हे पालिकेला सांगणे सध्या तरी अवघड आहे. आचारसंहितेमुळे सर्वांचे दुर्लक्ष आचारसंहितेमुळे बंद पथदिव्यांकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत, तर अधिकारी निवडणुकीच्या कामात आहेत. वॉर्डातील पथदिव्यांसाठी १३ ठेकेदार काम करतात. सिडको व शहरातील मुख्य रस्त्यांसाठी बीओटीवर कंत्राट देण्यात आले होते. सिडकोतील ५ हजार व शहरातील ५ हजार पथदिवे होते. बीओटीचा करार संपला आहे. सर्व पथदिवे बीओटीच्या कंत्राटदाराकडून सुरू करून घेतल्यानंतर सर्व यंत्रणा हस्तांतरित करून घेण्यात येईल. पथदिवे सुरू होत नाहीत, तोवर विनवॉककडून मनपा यंत्रणा ताब्यात घेणार नाही, असे विद्युत विभागाचे उपअभियंता पी.आर. बनसोडे यांनी सांगितले.