शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न, औषध विभागाच्या कारवाया थंडावल्या

By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री सुरु असून याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने हा गोरखधंदा फोफावतच चालला आहे.

शिरीष शिंदे , बीडजिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री सुरु असून याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने हा गोरखधंदा फोफावतच चालला आहे. मात्र पोलीस अधिकारी सक्रिय असल्याने गुटखा विके्रत्यांना पकडण्यात येत आहे. जुलै २०१३ मध्ये राज्य शासनाने गुटखा, सुगंधी सुपारी, पान मसाला आदीवर बंदी आणली आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. गुटखा बंदी केवळ कागदावर असून कोणत्याही ठिकाणी गेले तर गुटखा सहजरीत्या मिळतो. अन्न व औषध विभागाचे अधिकारी गुटखा साठे करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने गुटखा खुलेआम विक्री केला जात आहे. टपरीसह किराणा दुकानावर मिळतो गुटखाराज्यात गुटखाबंदी झाली असल्याचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. जिल्ह्यातील अनेक टपऱ्यांवर नव्हे तर किरणा दुकानांवर गुटखा उपलब्ध असतो. कोणत्याही दुकानावर गेले तर तेथील दुकानदार सहजपणे गुटखा मागितल्यावर हातावर टेकवितो. लहान टपऱ्या, चहाची हॉटेल्स, गाडे आदी ठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री केली जात आहे. कारवाई होत नसल्याने गुटखा विक्रीस जोर वाढला आहे.बाहेर राज्यातून जिल्ह्यात येतो गुटखासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात बाहेर राज्यातून गुटखा आयात केला जात आहे. त्याची साठेबाजी केली जात असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गुटखा उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातूनही गुटखा बीड जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. गुटख्याचा कायदा कितीही कडक असला तरी त्याला न जुमानता सर्रासपणे गुटखा विक्री राजरोजपणे सुरु आहे. खाणाऱ्यांची संख्याही अधिकजिल्ह्यात गुटखा खाणाऱ्यांची संख्या अधिक आहेत. मागणी असल्याने पुरवठा होत आहे. त्यामुळे हे अवैध काम सुरुच आहे. राज्य शासनाने बंदी आणली असली तरी गुटखा सोडणे अनेकांना शक्य नसल्याने ते चोरीने गुटखा खरेदी करतात व खातात. गुटख्याच्या आहारी तरुण पिढी जाऊ नये यासाठी शासनाने गुटखा बंदी केली आहे. मात्र तरीही युवक गुटख्याचे व्यसन सोडण्यास तयार नाहीत. चौका-चौकातील टपऱ्यांवर युवक पुड्या व मावा खाताना नेहमीच दिसून येतात. दुप्पट भावाने विक्रीबीड शहरातील एका टपरी चालकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने गुटख्याचे भावही वाढले आहेत. बाहेर जिल्ह्यातून गुटखा विक्रीस आणला जात असल्याने गुटख्याची विक्री दुप्पट भावाने करावी लागत आहे. ग्राहकांची संख्या अधिक असल्याने गुटखा जवळपास सर्वच टपरी चालक ठेवत असल्याचा दावाही त्याने केला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डी.जी. वीर यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाने योग्यवेळी कारवाया केल्या असत्या तर जिल्ह्यात गुटखा बंदी सक्षमपणे राबवली गेली असती अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. ‘त्या’दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडीगेवराई शहरात प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.ए. खिरडकर यांच्या पथकाने चार चाकी वाहनासह त्यातील दीड लाख रुपयांचा गुटखा शनिवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पकडला होता. ही कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.ए. खिरडकर, शिरपूरकर,पोलीस कॉन्स्टेबल विकास राठोड, विशाल वाघमारे, यवले यांनी केली. त्यांना शनिवारी गेवराई न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.