सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
By राम शिनगारे | Updated: October 10, 2022 15:10 IST2022-10-10T15:09:04+5:302022-10-10T15:10:06+5:30
बसमध्ये चढल्यानंतर त्याने अचानक बाहेर डोके काढले.

सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
औरंगाबाद: स्मार्ट सिटी बस जिल्हा परिषद मैदानातून वळण घेत असताना अचानक बाहेर डोके काढलेल्या ९ वर्षीय मुलाचा गेटच्या भिंतीवर डोके आदळल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली. हरिओम राधाकृष्ण पंडित (१४, रा.बजाजनगर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानाजवळ स्मार्ट सिटी बसचा थांबा आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास साजापूर- औरंगपुरा फेरीचा वेळ संपल्याने चालक बसला जिल्हा परिषद मैदानात घेऊन जात होता. मात्र, त्याचवेळी ९ वीत शाकारणार हरिओम राधाकृष्ण पंडितला वाटलं की बस साजापूरकडे चालली. त्यामुळे त्यांने बसमध्ये प्रवेश केला. बसमध्ये चढल्यानंतर त्याने अचानक बाहेर डोके काढले. याचवेळी जिल्हा परिषद मैदानाच्या गेटच्या भिंतीला त्याच्या डोक्याला जोरदार फटका बसून तो जागीच कोसळला. त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.