शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जाळीचा देव यात्रोत्सवास प्रारंभ; आज निघणार रथयात्रा

By admin | Updated: February 3, 2015 00:57 IST

फैजुल्ला पठाण/बाळू मोकासरे ,जाळीचा देव महानुभव पंथाचे संस्थापक गुरु श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या जाळीचा देव हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून

फैजुल्ला पठाण/बाळू मोकासरे  ,जाळीचा देवमहानुभव पंथाचे संस्थापक गुरु श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या जाळीचा देव हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी मंगळवारी माघ पौर्णिमेला पालखी रथ यात्रा निघणार आहे. या पूर्वसंध्येलाच परिसर गजबजून गेला असून मोठी यात्रा भरली आहे. या यात्रेनिमित्त प्रशासनानेही तयारी केली आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात १२ पोलिस अधिकारी, २५ कर्मचारी, १० महिला पोलिस यांचा समावेश आहे. पारध पोलिस ठाण्याअंतर्गत कर्मचारी व अतिरिक्त पोलिस बंदोबस्त जालना येथून मागविण्यात आला असल्याची माहिती पारध ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली.यात्रेनिमित्त एस.टी. महामंडळाच्या वतीने बुलढाणा, सिल्लोड, जालना, जळगाव, सोयगाव, जाफराबाद या आगारांमधून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात चार मोठे आश्रम आहेत. यात अंबेकर बाबा, लोणारकर बाबा, लासूरकर बाबा आणि मेहकर बाबा यांचे आश्रम आहेत. सुमारे २०० ते २५० साधक एकाचवेळी ध्यानधारणेस बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानतर्फे दररोज अन्नदान सुरू आहे. नगर व पुणे जिल्ह्यातील काही भाविकांनी श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या वतीने मोफत अन्नदान सुरू केले आहे.यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी आठ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिरात पुजेचा मान प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे असतो. महानुभाव पंथीय म्हणून या गावाची विशेष ओळख आहे. पुणे, नाशिक, मेहकर, भडगाव, पाचोरा तसेच विदर्भ व खांदेशातून विविध ठिकाणांहून भाविकांच्या दिंड्या या ठिकाणी दाखल होत आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीनेही आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती सरपंच सुमनबाई उदभरे व ग्रामसेवक एन.पी. सोळंके यांनी सांगितले. यात्रेनिमित्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार वाहनांची दर यात्रेला येथे ये-जा होते, असे पार्किंगचालक संजू वार्इंदेशकर यांनी सांगितले.