औरंगाबाद : जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरपूर संधी आहे. मात्र, मूलभूत असुविधांमुळे पर्यटनाची राजधानी असलेले ऐतिहासिक औरंगाबाद शहर दुर्लक्षित राहिले आहे. या भागातील पर्यटन केंद्रांच्या विकासाकरिता केंद्राने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी टुरिझम प्रमोटर्स गिल्डच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू आणि केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नायक यांना विविध मागण्यांचे निवेदन टुरिझम प्रमोटर्सतर्फे सादर करण्यात आले. दोन्ही मंत्र्यांनी या संदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आणि तातडीने पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. नवी दिल्ली येथे इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्सच्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादच्या टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधिवेशनात सहभाग घेतला. अधिवेशनात औरंगाबाद आणि परिसरात असलेल्या पर्यटन स्थळांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स संघटनेचे पदाधिकारी सुभाष गोयल, राजीव कोहली यांनीही हवाई सेवेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. यावेळी निर्मल त्रिवेदी, श्रीकांत जोगदंड, सलिमोद्दीन आदी उपस्थित होते.
औरंगाबादच्या पर्यटन विकासाला गती द्या
By admin | Updated: September 14, 2014 00:20 IST
औरंगाबाद : जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरपूर संधी आहे. मात्र, मूलभूत असुविधांमुळे पर्यटनाची राजधानी असलेले ऐतिहासिक औरंगाबाद शहर दुर्लक्षित राहिले आहे.
औरंगाबादच्या पर्यटन विकासाला गती द्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}