शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पेरले पण उगवेनाच़़़

By admin | Updated: July 28, 2014 00:53 IST

पाथरी : यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुरुवातीपासून पावसाने दगा दिला़ एका हलक्याशा पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली़

पाथरी : यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुरुवातीपासून पावसाने दगा दिला़ एका हलक्याशा पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली़ परंतु, पेरलेले उगवलेच नाही़ उगवलेले सुकून गेले आहे़ यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे़ ११ महिने पाऊस पडला़ परंतु, पावसाळ्यात पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे़ मागील अनेक वर्षानंतर यावर्षी जून आणि जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले आहेत़ शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडलाच नाही़ थोड्या फार प्रमाणात पडलेल्या पावसावरच या भागातील शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली़ तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ परंतु, पावसाने सतत हुलकावणी दिलेल्यान खरिप हंगामातील ही दोन्ही महत्तवाची पिके आज शेतकऱ्यांच्या हातची गेली आहेत़ अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या ही झाल्या नाहीत़ शेतात लागवड केलेल्या कापसाच्या बॅगपैकी अर्धी तूट झाल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे़ खरिपाच्या पेरणीचा हंगाम संपून जात असला तरी या भागात मात्र पावसाचे नाव नाही़ जुलै महिना संपल्यानंतर शेतकऱ्यांना तिबार पेरणीसुद्धा करता येणार नाही़ मागील वर्षी ११ महिने पाऊस पडत राहिला़ मार्च महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले़ फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार नसल्याची चाहूल तेव्हा शेतकऱ्यांना लागली होती़ निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांवर आगामी वर्षे कसे काढावे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे़ (वार्ताहर)परिस्थिती हतबल बहुतांश गावांतील खरिपाच्या पेरण्या केल्यानंतरही पावसाअभावी पिके पूर्ण हातची गेली आहेत़ यावर्षीची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी वाईट काळ घेऊन येणारी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच यामुळे विस्कळीत होणार असल्याची प्रतिक्रिया बोरगव्हाण येथील नाना पाटील इंगळे यांनी दिली़ वाईट अवस्थागोदाकाठच्या उमरा, कानसूर, गुंज, लिंबा, मुगल, अंधापुरी, गौंडगाव भागातही यावर्षी पावसाअभावी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे़ शेतकरी शेतामध्ये पाऊल टाकण्यासारखीसुद्धा परिस्थिती राहिली नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमरा येथील शेतकरी सुभाषराव कोल्हे यांनी दिली़ शेतात हिरवा चारा नाहीपावसाळ्याचे दिवस असूनही शेतामध्ये जनावरांना चारण्यासाठी हिरवा चारादेखील उगवला नाही़ शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कोरडा चारा संपण्याच्या मार्गावर आहे़ यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये आपली जनावरे व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधण्याची वेळ पावसाअभावी येणार आहे़ पाण्याची समस्या उद्भवणार यावर्षी जुलै संपला तरी पाऊस पडत नसल्याने जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे़ आतापासूनच काही गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे़ वेळेत पाऊस पडला नाही तर पावसाळ्यातदेखील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे़