शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST

मानवत : तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे अनेक गावातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.

मानवत : तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे अनेक गावातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण होतात. परंतु, यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. तालुक्यातील कुंभारी, थार, वांगी, हमदापूर, वझूर खुर्द व बु. या गावात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळबंल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यावे हे कळेनासे झाले आहे. पेरणीला उशीर झाल्याने या काळात येणारे एकमात्र पीक म्हणजे बाजरी होय. परंतु या पिकाला आपल्या भागात मागणी नसल्याने त्याला भावही येत नाही. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर बाजारातून कापूस, तूर, मूग, सोयाबीन आदी बियाणे व खते खरेदी करून आणून ठेवले आहे. परंतु पेरणी योग्य पाऊसच नसल्याने ही बियाणे घरातच पडून आहेत. त्यामुळे बी बियाणांचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर अतिरिक्त पडणार आहे. २२ जुलैच्या रात्री झालेला रिमझिम पाऊस पेरणीसाठी उपयुक्त आहे. पावसाने जर आणखी काही काळ दडी मारली तर शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचा हंगाम पूर्णपणे हातून जाण्याची शक्यता आहे, असे झाले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विंवचनेमध्ये आणखी भर पडणार आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात रिपरिप पाऊस पडत आहे़ काही शेतकरी अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ परंतु, काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ बियाणे उगवले नाही़ यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे़ निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे़ शेतकरी आजघडीला देशोधडीला लागला आहे़ (वार्ताहर)