शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

डिजिटल सातबारा सर्व्हरचे लवकरच खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:23 AM

मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, तर खान्देशातील नंदुरबार, विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यांतील डिजिटल सातबारा मिळण्यात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देपाच जिल्ह्यांतील काम बंद : पुण्यातील संस्थेचे सर्व्हर तात्पुरत्या स्वरूपात वापरणार

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, तर खान्देशातील नंदुरबार, विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यांतील डिजिटल सातबारा मिळण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून येत्या काही महिन्यांत खाजगी कंपनीकडून सर्व्हर घेण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. खाजगी संस्थेकडील सर्व्हरवरून हायस्पीडने आॅनलाईन सातबारा मिळण्याचे काम सुलभ होईल. तोपर्यंत पुण्यातील एनआयसी केंद्रावर पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सातबारा खात्यांचा डाटा स्टोअर करण्यात येणार आहे. या पाचही जिल्ह्यांतील तलाठी, मंडळ अधिका-यांची आॅनलाईन आणि आॅफलाईन कामे करताना तारांबळ उडणारच आहे. शिवाय शेतकºयांना सातबारा घेण्यासाठी ताटकळत बसावे लागणार आहे.ई-फेरफार प्रकल्प अंमलबजावणीसाठी स्टेट डाटा सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व्हरची क्षमता व स्पेस कमी झालेली आहे, त्यामुळे सर्व्हरवर अतिरिक्त ताण पडून बिघाड होत आहे. याप्रकरणी शासनाने बैठक घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने सर्व्हर सुविधा खाजगीकरणातून घेण्याबाबत धोरणात्मक विचार सुरू केला आहे. सध्या उपाय म्हणून वरील पाचही जिल्ह्यांतील डाटा कॉपी करून तो पुण्यातील एनडीसी येथे साठविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी खातेदारांना पीककर्ज व पीक विम्याकरिता गाव नं.७/१२ व ८ अ हे प्रमाणपत्र उपलब्ध होईल. यासाठी वरील सर्व जिल्ह्यांना एनआयसी व सिस्को खाते उघडावे लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यांकडून कर्मचाºयांचे मोबाईल क्रमांक व पासवर्ड मागविण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल सूत्रांनी दिली.प्रकल्प समन्वयकांनी सांगितलेपाच जिल्ह्यांचे काम बंद झालेले आहे. सर्व्हरवर स्पेस (सातबारा व इतर मजूकर साठवून ठेवण्यासाठी जागा नसणे) उपलब्ध नाही, त्यामुळे त्या जिल्ह्यांचे काम बंद आहे. सर्व्हरची स्पेस उपलब्ध करून देण्यासाठी काहीही सुविधा सध्या उपलब्ध नाही. शासनाने प्रायव्हेट क्लाऊडवर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्याला उशीर लागेल.दरम्यान, एनआयसीचे पुण्यातील जे सेंटर आहे. तेथे डाटा पूर्ण कॉपी करून स्टोअर करण्यात येईल. सध्या एनआयसीच्या नेटवर्कनुसार काम सुरू आहे. दोन दिवसांत पुण्यातील सर्व्हर सुरू होईल. सोमवारपासून पुण्यातील सर्व्हरचे काम पूर्ण होईल. एनआयसीकडे स्पेस नसल्यामुळे ही तात्पुरती सोय आहे. काही महिन्यांतच खाजगीकरणातून स्पेस घेतली जाणार आहे, असे प्रकल्प समन्वयक रामदास जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :onlineऑनलाइनAurangabadऔरंगाबादdigitalडिजिटल