शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याणची पत्रे वाटप योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 00:26 IST

लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना

लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना पत्रे वाटप करण्यात येतात़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील घोटाळ्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून समाजकल्याणचे पत्रे वाटप ठप्प आहे़ विशेष घटक योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना दिला जातो़ मागील दोन वर्षांपासून पत्रे वाटप करण्यात आले नसूल ३ हजार ७६१ लाभार्थी वंचित राहीले आहेत़ समाजकल्याणच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना लोखंडी पत्रे वाटप केले जातात़ २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात समाजकल्याण विभागाने एकाही लाभार्थ्यांना पत्रे वाटप केले नाही़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील झालेला भ्रष्टाचार व त्या अनुषंगाने संबंधितांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे याचा विचार करता, लातूर जिल्हा परिषदेने २०१४-१६ अंतर्गत १ कोटी २२ लाख रुपयांच्या पत्रे वाटपासाठी सर्वसाधारण सभेकडून मंजूरीही मिळविली़ पण या ना त्या कारणाने विशेष घटक योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे पत्रे अद्यापही वाटप केले नाहीत़ परिणामी, लातूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना पत्र्यांचा लाभ मिळाला नाही़ जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून रितसर आर्थिक तरतूद करूनही पत्रे वाटपाची प्रक्रिया मात्र धिम्या गतीने सुरु आहे ़ दोन वर्षाचे सुमारे ३ हजार ७६१ लाभार्थी पत्र्यांपासून वंचित आहेत़ पारदर्शकतेच्या नावाखाली प्रक्रिया क्लीष्ट पद्धतीने राबविण्यात येत आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांचा पत्रे वाटपाचा प्रश्न रखडला आहे़ (प्रतिनिधी)