सामाजिक परिवर्तनाचे काम साहित्यातून

By Admin | Updated: February 2, 2015 01:14 IST2015-02-02T00:59:19+5:302015-02-02T01:14:16+5:30

केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले

Social innovation from literature | सामाजिक परिवर्तनाचे काम साहित्यातून

सामाजिक परिवर्तनाचे काम साहित्यातून


केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले. रविवारी मराठवाडा साहित्य परिषद व छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
येथील वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. गोपीनाथ मुुंडे नगरीत हे संमेलन होत आहे. प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे अध्यक्षस्थानी होते. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. सतीश साळुंके, राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. देशमुख म्हणाले, साहित्यातून अन्याय-अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याचे बळ मिळते. अशा संमेलनातून ग्रामीण लेखक, कवींना वाव मिळण्यास मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. राजपंखे म्हणाले, संमेलनातून समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब उमटते. मसापच्या पुढाकारातून पार पडत असलेल्या या संमेलनाने परिवर्तनाचा जागर होत आहे. शब्दांच्या अविष्काराची ही मैफिल नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. ‘घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना पुन्हा जाळले पाहिजे’ ही गजल त्यांनी सादर केली. त्याला उपस्थितांनी दाद दिली.
आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, डॉ. साळुंके यांची भाषणे झाली.
दरम्यान, दिवसभर संमेलनात विविध कार्यक्रम पार पडले. संमेलन स्थळी पुस्तकांचे स्टॉल लागले होते. दुपारच्या सुटीमध्ये व सकाळी येथे गर्दी झाली होती. (वार्ताहर)
संमेलनापूर्वी सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. मुख्य रस्त्यावरुन दिंंडी वसंत महाविद्यालयात पोहोचली. यावेळी भजनी मंडळ, कलशधारी मुली, विविध वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी होते. त्यांनी केजकरांचे लक्ष वेधले. व्यंकटराव राऊत, समाधान शर्मा, श्रीराम जोशी, रघूनाथ चौरे, प्राचार्य डॉ. गौतम पाटील, लक्ष्मण डोईफोडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Social innovation from literature