शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

स्मिता आणि पूर्वा शहाणे जोडी ठरली नं. १

By admin | Updated: December 22, 2015 23:54 IST

औरंगाबाद : लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सासू-सुनांचे नाते दर्शविणाऱ्या एका कौटुंबिक कार्यक्रमाचे म्हणजेच ‘जोडी नं. १ सासू-सून’चे आयोजन करण्यात आले होते

औरंगाबाद : जीवनाचे अनेक रंग दाखविणारे कौटुंबिक चॅनल कलर्स व स्त्रियांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणारे लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सासू-सुनांचे नाते दर्शविणाऱ्या एका कौटुंबिक कार्यक्रमाचे म्हणजेच ‘जोडी नं. १ सासू-सून’चे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १२ सासू- सुनांच्या जोड्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आणि कार्यक्रमाला रंगतदार बनविले.
‘जोडी नं. १ सासू-सून’ होण्यासाठी चार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी पहिली फेरी होती परिचय फेरी म्हणजेच बिनधास्त बोल फे री. या फे रीत सासू-सुनांना एका मिनिटात एकमेकींचा परिचय करून द्यायचा होता. अनेक जोड्यांची या फेरीमध्येच धांदल उडाली.
काहींनी एकमेकींवर कविता सादर करून कवितेद्वारे एकमेकींची ओळख करून दिली. विशेष म्हणजे सविता शिंदे ही नऊ महिन्यांची गर्भवतीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
दुसरी फेरी होती सादरीकरण फेरी. सासू-सून जोडीची एकत्रितपणे एखादी गोष्ट करण्याची हातोटी तपासणे, तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे हा या फेरीमागचा उद्देश होता. अनेक जोड्या या फेरीत प्रभावी ठरल्या. सासू-सून जोड्यांनी नाटक, भजन, गीते आणि एकत्रितपणे नृत्यसुद्धा सादर केले.
काही जोड्यांमध्ये तर आजवर कधीही व्यासपीठावर न येणाऱ्या सासूबार्इंचा उत्साह सूनबार्इंना लाजविणारा होता. सासू-सुनांमध्ये असणारा सुसंवाद या निमित्ताने दिसून आला.
यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर फेरीमध्ये परीक्षकांनी या जोड्यांना प्रत्येकी एक-एक प्रश्न विचारला. स्पर्धकांचा हजरजबाबीपणा तपासणे, तसेच न बिचकता चटकन उत्तर देणे अपेक्षित होते. यात पौराणिक प्रश्नांपासून ते थेट आताच्या निर्भया प्रकरणापर्यंतचे अनेक प्रश्न विचारण्यात आले.
उत्तेजनार्थ पारितोषिके- रत्ना आणि कीर्ती बाविस्कर, लताबाई आणि सविता शिंदे, मीना आणि अश्विनी दहीहंडे आदी सासू-सून जोड्यांनी मिळविली. विजेत्यांना लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, विनोदवीर प्रकाश भागवत तसेच स्नेहा कदम, परीक्षक संगीता दीक्षित, शोभा दांडगे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. नीता पानसरे यांनी संचालन केले.
‘जोडी नं. १ सासू-सून’ या कार्यक्रमाची तयारी करीत असताना स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या घरी कसे वातावरण असेल, यावर सादर केलेला एक विनोदी कार्यक्रम सखींना विशेष आवडून गेला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे परीक्षण गायिका आणि वकील असणाऱ्या संगीता महामुनी- दीक्षित यांनी आणि अभिनेत्री- निवेदिका शोभा दांडगे यांनी केले. या सगळ्या फेऱ्यांमध्ये चांगले सादरीकरण करून आणि परीक्षकांच्या कसोटीला खरे उतरून सासू स्मिता, तर सून पूर्वा शहाणे या जोडीने विजय मिळवीत ‘जोडी नं. १ सासू-सून’ हा किताब पटकाविला. द्वितीय क्रमांक सुनीता-कीर्ती देशपांडे यांना मिळाला, तर परफेक्ट मॅचिंग करून आलेल्या मंजूषा आणि निशिगंधा काळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
यानंतर कलर्स फेरी घेण्यात आली. या फेरीत कलर्स चॅनलवरील ‘ससुराल सिमरन का’, ‘मेरी आशिकी तुमसे है’, ‘थपकी’, ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकांमधील सासू-सुनांचे काही प्रसंग स्पर्धकांना दाखविण्यात आले. नंतर आवाज बंद करून स्पर्धकांना दाखविण्यात आलेले मालिकेतील प्रसंग जसेच्या तसे अभिनय करून सादर करायचे होते.
परफेक्ट मॅचिंग फेरीत सासू-सुनांचा पेहराव एकमेकींशी किती मिळताजुळता आहे, ते तपासले गेले. अनेक जोड्यांनी या कार्यक्रमासाठी खास खरेदी केली होती. टिकल्यांपासून ते चपलांपर्यंत तंतोतंत सारखे घालून आलेल्या जोड्यांना गुण देताना परीक्षकांची धांदल उडाली.
‘फू बाई फू ’ फेम प्रकाश भागवत आणि स्नेहल कदम यांनी प्रत्येक फेरीनंतर विनोदी चुटकुले सादर करून सर्व सखींना हसते ठेवले.