शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सहा तरुणांची सुखरूप सुटका

By admin | Updated: September 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या औरंगाबादेतील सहा तरुणांची भारतीय लष्कराच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.

औरंगाबाद : काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या औरंगाबादेतील सहा तरुणांची भारतीय लष्कराच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. हे सहाही तरुण सध्या परतीच्या वाटेवर आहेत. यामध्ये औरंगाबादेत शिक्षण घेत असलेल्या दोन इराकी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीर राज्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पुरात सापडल्यामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अजूनही हजारो लोक ठिकठिकाणी पुराने वेढले आहेत. त्यात औरंगाबादेतून पर्यटनासाठी गेलेले मोहम्मद शाहेद मोहम्मद अमीन (२४), असेम सिद्दीक (२०), मोहम्मद तहा अब्दुल रऊफ (१८), एहतेशाम अहमद (२०), मुस्तफा (२४) आणि झैद खलील इस्माईल (२५) हे सहा तरुण बेपत्ता झाले होते. श्रीनगर शहरास पाण्याने वेढल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र, आता या चारही जणांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप आहेत.श्रीनगर शहरातील गव्हर्नर हाऊस भागातून भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली आहे. लष्कराच्या जवानांनी वाचविल्यानंतर हे तरुण दिल्लीमार्गे औरंगाबादच्या दिशेने प्रवासासाठी निघाले आहेत. सहापैकी मुस्तफा आणि झैद खलील इस्माईल हे दोघे इराकी विद्यार्थी असून, ते औरंगाबादेत एमपीएडचे शिक्षण घेत आहेत. हे दोघे स्वतंत्रपणे पर्यटनासाठी गेले होते. तर उर्वरित चौघे एका गटात होते. या चौघांमधील तिघे जण मौलाना आझाद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. काही वेळाने हा भागही चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला. खांब पडल्यामुळे वीज गेली. सर्वत्र पूर होता; पण पिण्यासाठी मात्र पाणी मिळत नव्हते. सलग तीन दिवस आणि दोन रात्र पुराने वेढले गेलो होतो. अन्न-पाण्यावाचून एकेक क्षण अवघड जात होता. कडाक्याची थंडी होती, पांघरायला चादरीही नव्हत्या. मोबाईल डिस्चार्ज झाले होते, त्यामुळे कुणाशीही संपर्क करू शकत नव्हतो. आता वाचणे अवघड आहे, असे वाटत होते; पण अखेर काल लष्कराचे जवान आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आमची सुखरूप सुटका केली.